● अंजुमन इस्लाम कॉलेजमधे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम
● सुनिल तटकरे यांच्या कल्पना शक्तीचा अंदाज घेणे कठीण - गुलाम पेशमाम यांचे गौरोदगार
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
लहानपणी शालेय जीवनात शिक्षण घेऊन भावी आयुष्यात यशस्वी वाटचाल करीत असताना ज्या शिक्षकांनी चांगले शिक्षण देऊन घडविले त्या शिक्षकांची शिकवण कायम स्मरणात ठेवली पाहिजे आणि त्यांचा आदर राखला पाहिजे असा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असते असे मार्मिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी 16 फेब्रुवारी रोजी अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले आहे.
यावेळी सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना त्याच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन माझ्या गुरुजनांनी दिलेल्या शिकवणुकीमुळेच मी आज वेगवेगळ्या पदावर काम करीत असल्याचे सांगताना अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळाची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन राज्य पातळीवर म्हसळा तालुका व कॉलेजचे नावलौकिक केले पाहिजे असे सांगितले. तसेच म्हसळा तालुक्यात हिंदू-मुस्लिम एकत्र राहून एकतेचे दर्शन घडवीत असल्याने या सर्वधर्म समभावाचा आदर्श जगाने घेतला पाहिजे असे सांगितले. तसेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याने प्रत्येकाने स्त्रियांचा आदर केला पाहिजे त्याचबरोबर या कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण मंत्री असताना भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे भविष्यात देखील शैक्षणिक उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच 2009 साली परस्पर विरोधी विधानसभा निवडणूक लढविलेले गुलाम पेशमाम यांना चिमटे काढताना तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या बाकी सर्वांगीण विकास करण्यासाठी सुनिल तटकरे आपल्या सेवेत तत्पर असेल असे ठणकावून सांगितले.
सुनिल तटकरे यांच्या कल्पना शक्तीचा अंदाज घेणे कठीण - गुलाम पेशमाम यांचे गौरोदगार
तसेच 2009 साली श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची निवडणूक परस्पर विरोधी लढलेले अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुडचे माजी अध्यक्ष गुलाम पेशमाम यांनी सुनिल तटकरे यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करून स्तुतीसुमणे उधळली तसेच तटकरे यांच्या कल्पना शक्तीचा अंदाज घेऊ शकत नाही असे गौरोदगार काढले व भविष्यात रायगडालाच नव्हे तर देशाला सुनिल तटकरे यांची गरज असल्याचे सांगून मागील झाले गेले विसरून आगामी काळात आपण सुनिल तटकरे यांना मोठ्या भावाप्रमाणे साथ देऊ अशी ग्वाही दिली. तसेच कॉलेज च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून शैक्षणिक प्रगती समाधानकारक असल्याचे सांगून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
तसेच या कार्यक्रमादरम्यान जम्मू-कश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय जवाण शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थी सुरभी बोरकर हिने उर्दू मध्ये आणि आयेशा तसफा हिने मराठी मध्ये तसेच खतीम जंजिलकर या विद्यार्थिनी इंग्लिश मध्ये " स्त्री भ्रूण हत्या " तसेच स्त्रीचा आदर कसा करायचा या विषयावर जोरदार मार्मिक भाषण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व शिक्षकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुडचे माजी अध्यक्ष गुलाम महंमद पेशमाम, अहेमद हसन इर्फानशा, रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष नाझीमभाई हसवारे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अलिशेठ कौचाली, जेष्ठ नेते बालशेठ करडे, जेष्ठ नेते भाई दफेदार, मुस्लिम समाज अध्यक्ष अहमद पेनकर, तालुका अध्यक्ष समीर बनकर, रायगड जिल्हा मुख्य संघटक शाहीद उकये, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले, नगराध्यक्षा फळकनाझ हुर्जुक, रफिक चनेकर, मुब्बाशिर जामदार, अमंहुल्ल महमद शफी गीते, रियाज खतीब, साजिद इनामदार, नासिर मिठागरे, नसरीन काजी, हुमरा खान, मुईद घराडे, खालिद सिद्दीकी, हिफझुरहमान नजीर, अल्ताफ मलिक, फझल हालडे, मझर काजी, बशीर उलडे, याकूब खान, शकुर घणसार, सलाम हुर्जुक, नाझीम चोगले, युवक अध्यक्ष फैसल गिते, शहर युवक अध्यक्ष नईम दळवी, म्हसळा शहराध्यक्ष रियाज घराडे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष रियाज फकी, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष अशोक काते, अल्पसंख्यांक सेल सरचिटणीस सलीम बागकर, मुबिन हुर्जुक, भाई बोरकर, यांसह नगरसेवक व नगरसेविका तसेच अंजुमन इस्लाम जंजिरा कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी व म्हसळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment