जम्मू मधील जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळा १०० टक्के बंद



म्हसळा : प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळा शहरात ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य निषेध मोर्चा म्हसळा तालुक्यातील सर्व धर्माय , सर्व पक्षीय , रिक्षा संघटना , मिनिडोअर संघटना , हिंदू संघटना तसेच सर्व नागरिकांनी काढला होता . यामध्ये म्हसळा शहरासहीत तालुक्यातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता . या निषेध मोर्च्यात पाकिस्तान मुर्दाबाद ! , भारत माता की जय ! , वंदे मातरम ! , जय जवान जय किसान ! च्या घोषणा देण्यात आल्या . या निषेध मोर्च्यात सहभागी प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रचंड राग , रोष स्पष्टपणे दिसून येत होता . शहद झालेल्या जवानांना म्हसळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली व या भ्याड हल्याच्या निषेधार्थ म्हसळा तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रामदास झळके यांच्याकडून भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले . तसेच या निषेध मोर्चात  म्हसळा बंदची हाक या मोर्चात देण्यात आली . या मोर्चा प्रसंगी म्हसळा तालुका प . स . सभापती छाया म्हात्रे , उपसभापती संदीप चाचले , संजय खांबेटे , तालुका हिंदू समिती चे अध्यक्ष महादेव पाटील , अल कौचाली , शिवसेना ता . प्र . नंदू शिर्के , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर , भाजप चे सरचिटणीस तुकाराम पाटील , शैकाप चे संतोष पाटल , काँग्रेसचे शहराध्यक्ष रफ़िक घरटकर आदी उपस्थित होते 

तालुक्यात प्रथमच शंभर टके बंद केला . सकाळपासून  संपूर्ण म्हसळा शांत झाला  होता . सर्व राजकीय  मंडळी , सर्व समाज नेते यांनी विशेष सहभाग नोंदविला होता . ग्रामीण भागातील सर्व नागरिक या बंदमध्ये सहभागी झाले होते 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा