तिसऱ्या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला तुफान प्रतिसाद


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
तिसऱ्या इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सनी गतवर्षीच्या तुलनेत तुफान प्रतिसाद दिला. यावर्षी या फेस्टिवलमध्ये केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून जवळपास १९४ शॉर्ट फिल्म सहभागी झाल्या आहेत. त्यांपैकी निवडक १०० शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग १०, ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी केशर चित्रमंदिर, इंदापूर, पुणे येथे करण्यात येणार आहे. मराठी, तेलुगु, मल्याळम, हिंदी, बंगाली, कोकणी आणि इंग्रजी अशा विविध भाषांतून संपूर्ण भारतातील शॉर्ट फिल्म याठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी रसिक प्रेक्षकांनी सोडू नये प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे.पहिल्या दोन्ही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, कोलकत्ता, तामिळनाडू, नवी दिल्ली, राजस्थान, आसाम, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यातील शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या  होत्या अशी माहिती फेस्टीवलचे दिग्दर्शक सोमनाथ जगताप यांनी दिली. सहभागी होणाऱ्या स्पर्धत उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, संकलन, संगीत, अभिनय, पटकथा, बेस्ट ज्युरी अॅवार्ड अशा विविध गटांतील स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच प्रथम उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १५ हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह, द्वितीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी १० हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह,  तृतीय उत्कृष्ट शॉर्टफिल्मसाठी ७ हजार रूपये पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या फेस्टीवलच्या माध्यमातून शहरी कलाकारांप्रमाणे ग्रामीण भागांतील नव नवे चेहरे आणि ठसकेबाज विषय घेऊन बनवलेल्या शॉर्ट फिल्म आपल्याला पहायला मिळतील आणि यातूनच आपल्याला नवीन अभिनेते मिळतील. तसेच ग्रामीण भागांत शॉर्ट फिल्म म्हणजे नक्की काय असते हे समजायला मदत होईल त्यासाठीच आम्ही याही वर्षी इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीवलचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर शहराचे नाव फेस्टीवलच्या माध्यमातून सर्व चित्रपट क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फेस्टीवलचे ज्युरी सदस्य म्हणून मा.डॉ.चंद्रशेखर जोशी सर आणि मा.सुनिकेत गांधी हे काम पाहत आहेत. ग्रामीण भागामध्ये सिनेमागृहात होणारा एकमेव नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टीवल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा