खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि.) वतीने हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ मुंबई (रजि.) व नेरूळ गावात राहणाऱ्या खरसई गावातील स्थानिक महिलांच्या वतीने खरसई गाववातील नेरूळ विभागात राहत असलेल्या महिलांनी एकत्र येत आज हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.  प्रसंगी स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे या उपस्थित होत्या. जनाताई चंद्रकांत खोत यांनी पुष्गुच्छ देऊन मंदाताईचे स्वागत केले. तर पुष्पाताई परशुराम पयेर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन खरसई आगरी समाज ग्रामस्थ मुंबई (रजि.) च्या वतीने करण्यात आले होते. प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष हरीश पयेर,  यशवंत शितकर,  मनोज माळी, कृष्णा पयेर,  भालचंद्र पयेर,  महादेव लेपकर,  प्रदीप खोत,  संदीप म्हसकर आदी उपस्थिती होते..
पारंपरिक सणांना आधुनिकतेची झालर चढली असली तरी, अजूनही स्रियांनी अनेक पारंपरिक सणांचे महत्त्व कायम ठेवले आहे. त्यापैकी एक म्हणजे मकरसंक्रांती. संक्रांत म्हणजे स्रियांचा सण, हळदीकुंकू कार्यक्रम आणि वाणांची लूट. काळानुरूप वाणांच्या वस्तू बदलल्या असल्या तरी, अजूनही हळदीकुंकवाचे महत्त्व मात्र अबाधित असल्याची प्रतिक्रिया महिलांनी "म्हसळा live'कडे व्यक्त केली. 
मकरसंक्रांतीनिमित्त आसपासच्या तसेच परिचयाच्या स्त्रियांना घरी बोलावून हळदीकुंकू आणि तिळगूळ देऊन वाण वाटण्याची प्रथा आजही सुरूच आहे. फरक केवळ एवढाच की आधुनिक युगात ही प्रथासुद्धा आधुनिक झाली आहे. नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकरसंक्रांतीनिमित्त दोन क्षण विरंगुळ्याचे मिळाल्याने त्यासुद्धा यात उत्साहाने सहभागी होत असतात. घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत पेलताना बऱ्याचदा तिला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. अशावेळी वर्षातून एकदा तरी येणारी मकरसंक्रींत त्यांना विरंगुळ्याचे चार क्षण देण्यासाठी मदतीचा हात देणारी ठरते. घरोघरी होणाऱ्या या समारंभाला आता सार्वजनिक समारंभाचे रूप आले आहे. सार्वजानिक हळदीकुंकू केले जात असल्याने वेळही वाचतो आणि परंपराही जपली जाते. 


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा