विविध कार्यालयांत शिवप्रतिमेचे करण्यात आले पूजन
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील तहसील कार्यालय, सार्वजनिक वाचनालय,पंचायत समिती, शिक्षण विभाग येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली . बहुतांश कार्यालयांतून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. तहसील कार्यालयातील मुख्य कार्यक्रमात तहसीलदार रामदास झळके यानी शिवप्रतिमेचे पूजन व अे. पी. आय. प्रविण कोल्हे यानी श्रीसंत रोहीदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, संतोष तावडे, प्रकाश भोईर, सचिन धोंडगे, विशाल भालेकर, एन.बी. सानप, जे.डी. मोरे, महेश रणदिवे, जयंता भस्मा, श्रीमती एस.डी. लिमकर, पूनम कारंडे, सलीम शहा, गोरखनाथ माने, कैलास पाटील, जितेंद्र शेळके, जे.डी. मोरे ,यसंतोष तावडे, प्रकाश भोईर , गजानन गीऱ्हे .भाऊ पाटील .सुविधा ऎनकर, संतोष विरकूड, पांडुरंग कळंबे, दिपक चव्हाण, बाळाराम उभारे, बहुतांश तलाठी, सगणक ऑपरेटर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment