जळत्या झोपडीतील कपडे वाचविण्याच्या नादात आदीवासी महीला ७० % भाजली : आडी बंदर येथील घटना

फोटो संग्रहीत

संजय खांबेटे : म्हसळा 

म्हसळा तालुक्यातील मौजे आडी बंदर वाडी येथील दिलावर यांच्या  आंबा बागायतीतील झोपडीला सायं .४ च्या सुमारास आग लागली , जळत्या झोपडीतील कपडे काढण्यासाठी गेलेल्या शैला विजय हिलम वय २२ ही महिलाच आगीचे भक्ष ठरुन सुमारे ७० % भाजल्याचे ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.कत्पांत शुक्ल यानी सांगितले. विजय हिलम व त्याची पत्नी शैला हे आडी बंदर ता. म्हसळा येथील दिलावर यांचे आंबा बागायतीत कुटुंबा समवेत राखण करीत असत. बागायतीत असणाऱ्या झोपडीला सायं ४च्या दरम्यान आग लागली, ४ वर्षाच्या छोटया मुलीने बाहेरील विस्तव झोपडीत नेला हे झाले आगीचे निमीत्त, आगीचे  वृत्त कळताच शैला हिलम ही झोपडी जवळ आली, आपले सर्व जळते आहे थंडीचे दिवसांत निदान नेसते  कपडे तरी वाचवावे या नादाने झोपडीत कपडे काढण्यासाठी गेली असता शैला आगीचे भक्ष ठरली तीची मान, हात, पोट व शरीराचा  अन्य भाग असे ७० % शरीर भाजले. संबधीत वृत्त कळताच तालुका कार्यकारी दंडाधिकारी  रामदास झळके व API प्रविण कोल्हे यानी   शैलाची मृत्यू पूर्व जबानी नोंदविली.म्हसळा पोलीसानी  घटनेची नोंद केली असून तपास श्रीवर्धन पोलीसांकडे देण्यात येणार आसल्याचे हे. कॉ. सुर्यवंशी यानी सांगितले.

 " तालुक्यात आरोग्य सेवेची बोंब असताना 108 अॅबुलन्स नसल्याने रुग्णाची हेळसांड झाली , जळत्या शैलाला जेमतेम विझऊन मोटर सायकलने आड़ीवरून माहेरी कोळे येथे व तेथून म्हसळा ग्रामिण रुग्णालयात आणावे लागले यात तब्बल  २ ते २॥ तास गेले,  केले .परंतु 108 अॅबुलन्स येयला २ ते २॥ तास गेल्याने , ग्रामिण रुग्णालयातील तुटपुंज्या सुविधेत  रुणावर डॉ.कत्पांत शुक्ल याना तारेवरची कसरत करीत उपचार करावे लागले. शैला भाजल्या पासून उपचार करण्यावर फार वेळ गेल्यामुळे अद्यापही म्हसळा कराना आरोग्य सुविधांसाठी समस्यांवर मात करावी लागत आहे"


   म्हसळा, श्रीवर्धन व तळा या  तालुक्यासाठी मध्यवर्ती असणाऱ्या म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत सुविधा परिपूर्ण व्हाव्यात, त्यामध्ये अद्ययावत साहीत्य, ती हाताळणारे तांत्रिक सहाय्यक, वाहतुकीची साधने ह्याच Point वर. कायम स्वरूपी 108 अॅबुलन्स असावी.
-महादेव पाटील, मा.सभापती.पं.स म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा