व्हॅलेटाइनच्या फीव्हरमुळे युवा पिढीमध्ये वाढत आहे डिजिटल डिप्रेशन


व्हॅलेटाइन विशेष :  म्हसळा Live
हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचे नेटवकिंग करण्यात जास्त रमलेली दिसते . पण या तरुणांना नाती खरंच किती कळतात हा प्रश्नच आहे . फेसबुक , द्विटर , व्हॉसअॅप , इंस्टाग्राम हे सध्या कनेक्ट राहण्यासाठीचे युवा पिढीचे आघाडीचे साथीदार . कॉलेजमधल्या प्रेमीयुगुलांसाठी तर हे एक वरदानच आहे परंतु सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजच्या युवा पिढीमध्ये डिजिटल डिप्रेशन वाढत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे . आजकालचं जग जसं प्रत्येक गोष्टीत ऑनलाईन होत जातंय , तसंच नाही टिकवण्यासाठीही व नवीन नाते बनविण्यासाठी ऑनलाईन व्हावं लागेल की काय हा प्रश्न पडत आहे . याविषयी अधिक माहिती देताना मानसशास्त्राची पाश्र्वभूमी असलेल्या पवई येथील टेलिपथी तज्ञ तरनुम डोब्रियाल सांगतात , गेल्या वर्षात माझ्याकडे येणाया डिजिटल डिप्रेशनच्या केसेस वाढत आहेत . फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोशल मीडियामध्ये आपल्या बॉयफ्रेड अथवा गर्लफ्रेंड सोबत फोटो शेयर करण्यास सुरुवात होते . शाळा कॉलेज मध्ये जाणार्या मुलांमध्ये पिअर प्रेशर म्हणजेच आपल्या कॉलेजमधील मित्र मैत्रिणींचे मानसिक दडपण असते . या दडपणामुळे जर आपला मित्र अथवा मैत्रीण नातेसंबंधात असतील तर हा पीअर प्रेशर वाढण्याचा संभव असतो . कारण या वयामध्ये आपला मित्र अथवा मैत्रीण जर नातेसंबंधात आहेत व ते सोशल मीडियामध्ये पोस्ट टाकून संपूर्ण जगाची वाहवा घेत असतील तर आपण का मागे आहोत या भावनेने त्यांच्यामध्ये डिजिटल डिप्रेशन वाढीस लागते . सोशल मीडियामध्ये स्वतच्या जास्त सेल्फी टाकणे अथवा सोशल मीडियाचा वापर कमी करणे तसेच नकारात्मक पोस्ट टाकणे ही या डिजिटल डिप्रेशनची लक्षणे आहेत . मुंबई सट्टल येथील बोक्हार्ट हॉस्पिटलच्या मानोसोपचार तज्ञ सोशल मीडियाविषयी बोलताना डॉनूतन लोहिया सांगतात , सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्ती ही एका स्वतंत्र बेटासारखी झाली असून ती व्यक्ती आपल्या आयुष्यात रममाण होते परंतु त्याचवेळी तुमचे मित्र परिवार अथवा नातेवाईक व तुमचा जोडीदार यांच्याकडून अपेक्षा वाढल्या जातात उदाहरण सांगायचे झाले तर गेल्या आठवडयात माझ्याकडे एक २० वर्षांची तरुणी आली होती व ती मानसिक दृष्टया खचली होती तिच्याशी १ तास गप्पा मारल्यावर कळले की फेसबुक बर तिचे मित्र व मैत्रिणी तिला टॅग करीत नाही त्यामुळे तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता . २४ तास इंटरनेटचा वापर करणार्या आजच्या युवा पिढीला नक्कीच डिजिटल डिप्रेशनचा सामना करावा लागत असून यामध्ये पालकांची भूमिका फार महत्वाची असते . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा