तालुक्यातील ७० मतदान केंद्रातून मिळाला ईव्हिएम- व्हिव्हिपॅट १०० % पारदर्शक असल्याचा निर्वाळा


आम्ही मत ज्याला दिले तेथेच आमचे मत गेले : छाया म्हात्रे

संजय खांबेटे :  म्हसळा

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवणूक २०१९ च्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील ७० मतदान केंद्रातून ईव्हिएम- व्हिव्हिपॅट मध्ये १०० % पारदर्शकता आसल्याची जनजागृती झाल्यावर आज म्हसळा सार्वजनीक वाचनालयाचे हॉल मध्ये EVM   व. VVPATs अंतीम जनजागृती कार्यक्रम  तहसीलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी रामदास झळके यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला झळके यांनी मशीनची जोडणी, सुखात , मतदान करणे  व  VVPATs मध्ये दिलेल्या मतदाना बाबत खात्री करणे याची परीपूर्ण माहीती दिली यावेळी पंचायत समीतीच्या सभापती छाया म्हात्रे , जि. प. सदस्य बबन मनवे, पं.स. सदस्य मधुकर गायकर तीघांसह मतदानात भाग घेतलेल्या प्रत्येकाने आम्ही मत ज्या क्रमांकाला दिले तेथेच आमचे मत गेले. निवडणूक आयोगाची जनजागृती ,प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी  करण्याची पद्धत सुध्दा  अतीशय चांगली आसल्याचे उपस्थितानी सांगितले . यावेळी ग. वी. अ वाय.एन. प्रभे, Api प्रविण कोल्हे, परिक्षेत्र वन अधिकारी  पाटील , वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य  राघवराव , बी.एन. माळी व तालुक्यांतील बहुताश कार्यालयांतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होतते. तालुक्यातील ७० मतदान केंद्रातून २३ जाने. ते १२ फेब्रु पर्यंत म्हसळा मंडळ अधिकारी मंगेश पवार यांच्या समवेत विशाल भालेकर, सलीम शहा, गोरखनाथ माने, कैलास पाटील, जितेंद्र शेळके व खामगाव मंडळ अधिकारी जे.डी. मोरे यांच्या समवेत संतोष तावडे, प्रकाश भोईर , गजानन गीऱ्हे व भाऊ पाटील कार्यरत होते. यावेळी  EVM   व. VVPATs मशीनची परीपूर्ण कार्यवाही प्रत्यक्ष मतदान व हाताळणी करण्याचे दाखविल्याचे उस्थिता नी सांगितले.


"EVM   व. VVPATs मशीनने मतदान , टाकलेल्या मताची तात्काळ खात्री करण्याची पद्धत अतीशय पारदर्शक आहे. आम्ही मत ज्याला दिले तेथेच आमचे मत गेले .निवडणूक आयोग वापरत असलेल्या EVM   व. VVPATs मशीन बाबत मी सभापती व मतदार म्हणून कोणताही संशय घेत नाही  मशीन परीपूर्ण व पारदर्शक "
छाया म्हात्रे, सभापती .पं.स. म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा