संत निरंकारी मंडळाकडून श्रीवर्धन व म्हसळ्यात स्वच्छता मोहीम


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा येथील शासकीय रुग्णालयात, आज ता. 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सद्‌गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यामध्ये आज जगभरात 60 हुन अधिक देशात शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वडवली ब्रँच च्या वतीने बोर्लीपंचतन येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात, श्रीवर्धन व भरडखोल ब्रँच च्या वतीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात तर म्हसळा येथे खरसई ब्रँच च्या माध्यमातून  ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये संत निरंकारी मंडळाच्या श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील संयोजक म. प्रकाश म्हात्रे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली निंरकारी सेवा दलाच्या अनुयायी, भाविक मिळून दीडशेहून अधिक जणांनी रुग्णालयातील कोपर्या - कोपऱ्यात  साफसफाई करून प्रत्येक ठिकाणी एक ट्रॅक्टर कचरा जमा केला.  यासाठी बोर्लीपंचतन मधील बबन गोविंद पांगारे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून सहकार्य केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुरज तडवी व डॉ वैशाली तिवारी, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन मोहिमेचे कौतुक केले. 

या स्वच्छता मोहिमेसाठी यांनीही उपस्थित राहून स्वच्छतेत त्यांनीही हातभार लावला. वडवली सत्संग चे मुखी महात्मा गणेश नाक्ती जी, वडवली युनिट चे सेवादल अधिकारी विनोद पेरवे, तसेच सर्व सत्संग ने या स्वच्छता मोहिमेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा