( म्हसळा प्रतिनिधी )
रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे ५३ वे वार्षिक अधिवेशन या वर्षी रविवार दि. १७ फेब्रु. रोजी म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयामध्ये होणार असल्याचे रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी व म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यानी कळविले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक ग्रंथसखा ग्रंथालय बदलापूरचे अध्यक्ष शामसुंदर जोशी आहेत , प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यिक प्रकाश गुर्जर व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले , सहा. ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी व कोकण विभाग ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेंद्र वैती कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. म्हसळा तालुक्यात प्रथमच होणाऱ्या अधिवेशनला जिल्हयांतील ग्रंथालय चळवळीतील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यानी यावे असे आवाहन म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाचे सचिव अशोक काते यानी केले आहे.

Post a Comment