वसंतराव नाईक महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

भारताचे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व अल्पसंख्याक मंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी स्थापन केलेल्या म्हसळा  येथील वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, तसेच महिला समाजसुधारक, महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची दि.03 जानेवारी रोजी जंयती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एम.एच.सिद्दीकी, रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख सौ.सलमा चरफरे मँडम, वनस्पती शास्र विभागाच्या विभाग प्रमुख सौ.सलमा नजिरी मँडम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. 
कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ लेखनिक सौ.वनिता समेळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाविद्यालया तर्फे वंदन केले त्यानंतर महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी कु.सुप्रिया सावकार हिने 'सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षणातील योगदान' याविषयावर विचार माांडले. आपल्या ओघवत्या शैलीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी अभ्यासपुर्ण पध्दतीने विचार मांडताना स्रीयांनी शिक्षण घेणे ज्याकाळात पाप मानले जात होते त्याकाळात सावित्रीबाईंनी आपले शिक्षण कसे पुर्ण केले महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना कशी साथ दिली हे सांगतानाच सावित्रीबाईच्या काळातील महिला शिक्षणाची स्थिती आणि आजच्या काळातील महिलांचे शिक्षणातील स्थान याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून फरक आणि महिलांच्या  प्रगतीचा आलेख मनोगतातून मांडताना आजच्या काळातील महिला शिक्षणात अग्रस्थानी का पोहचू शकल्या ?  याबाबत कु.सुप्रिया हिने सांगितले की आजच्या काळात स्री शिक्षणसाठी स्रीयांच्या मागे  तिचे वडील, भाऊ, पती इतर नातेवाईक या रुपात जसे अनेक ज्योतिबा उभे आहेत तसेच आजची आर्थिक परिस्थिती ही देखील कारणीभुत आहे आज संसाररुपी रथ जर यशस्वीरीत्या पुढे घेऊन जायचा असेल तर मुलींना आपल्या शिक्षणाचा वापर स्वतःला विकसित करण्याबरोबरच आपल्या संसाराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देखील केला पाहिजे त्यासाठी पारंपरिक शिक्षणा बरोबरच व्यावसायिक शिक्षणक्रम देखील मुलींनी पुर्ण करणे गरजेचे आहे असे परखड मत आपल्या भाषणात सुप्रिया सावकार हिने मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थीनी कु.प्राजक्ता गाणेकर हिने केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रथम वर्ष कला शाखेतील कु.अर्चना येलवे या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी वाजे, तनु जाधव, स्वप्नाली मोहीते, स्मिता नाईक, धनश्री पाटील विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा