रायगड जिल्ह्यात रोखीच्या व्यवहारांनाच नागरिकांची पसंती


दिघी : गणेश प्रभाळे
एकीकडे कॅशलेस व्यवहाराचा वापर वाढावा , यासाठी धोरणे आखली जात असली तरीही प्रत्यक्षात मात्र , कॅशलेसचे मिशन मात्र फार दूर असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे नोटाबंदीचे वादळ शांत झाल्यानंतर गाजावाजा करत सुरू करण्यात आलेले कॅशलेसचे पर्यायसुद्धा बंद होताना दिसत असल्याने एकंदरच कॅशलेस नोटाबंदीपुरते मर्यादित असल्याचे चित्र दिसून येत आहे रायगड जिल्ह्यात सध्या रोखीच्या व्यवहारांनाच जास्त पसंती मिळत आहे . श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन शहर , दिघी , बोर्लीपंचतन , दिवेआगर , वडवली , शिस्ते , कापोली , कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांत रोखीने व्यवहार होतात . बोर्ली, श्रीवर्धन , दिघी येथे बँका आहेत मात्र त्यांकडून देखील कॅशलेस साठी आता कोणतेही प्रयत्न होतना दिसत नाहीत . त्यामुळे कॅशलेस मोहीम हा नुसता दिखाऊपणा होता का असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातोय . ग्रामीण भागात अद्यापही इंटरनेट सुविधा नाहीत त्यामुळे कॅशलेस मोहीम सध्या तरी यशस्वी होणे दूर आहे . जिल्हा प्रशासनाने कॅशलेस मोहीम सुरू केल्यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला . अधिकार्यांनी दुकानदार व्यापार्यांना प्रशिक्षण दिले . मात्र , बाजारात पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा आल्यानंतर नागरिकांनी रोखीने व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे . नागरिकांची कॅशलेस व्यवहार करण्याची मानसिकता अद्यापही नाही . नोव्हेंबर रोजी चलनातून आणि हजारच्या नोटा रद्द करण्यात आल्या . या नोटबंदीनंतर रोखीच्या व्यवहारांऐवजी ऑनलाईन , डिजीटल पेमेंटचा पर्याय निवडून नागरिकांना मकंशलेस व्यवहारांची सवय लावा , असे निर्देश रिझर्ह बँक ऑफ इंडियाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले . प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षणही देण्यात आले . मात्र , कित्येक महिन्यांपासून पासून कॅशलेश संदर्भातील जनजागृती मोहीम पूर्णत थंडावली असून रोखीच्याच व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा