म्हसळा तालुक्यात बिबट्यांचा संचार वाढला : तालुक्यांतील शेतकरी दहशतीत. मेंदडीकोंड येथील जंगलात बैलाला बिबटयाने केले ठार


संजय खांबेटे : म्हसळा 
तालुक्यात एकुण 5591.040 एवढ्या हेक्टरवर वनविभागाचे क्षेत्र आहे, यातील बहुतांश क्षेत्रात वन्य श्वापदांचा मुक्त संचार असतो. यामध्ये बिबटयांचे बरोबरीनेच रानडुक्कर , गवा , भेकर व अन्य प्राणी असतात. गाव खेडयाच्या परीसरांत ही श्वापदे मोठ्या प्रमाणात येतात .काही वर्षापासून तालुक्यातील मेंदडी, काळसुरी, खरसई, बनोटी, जांभूळ,केलटे, सणदेरी, खामगाव, लेप, वाघाव या परिसरांत बिबट्यांचा मुक्त संचार आहे. या परीसरांतील अनेक गोवंशीय जनावरे बिबट्यांचे भक्ष्य ठरली आहेत. तर काळसुरी  येथे बिबट्याच फासकीत अडकल्याची घटना आहे. अशाच प्रकारची घटना शनीवार दिनांक 1 डिसेंबर 2018 रोजी घडली, मेंदडीकोंड येथील शेतकरी कानु धर्मा कांबळे यांच्या मालकीचा बैलाला बिबट्याने भक्ष्य केले. बैल जांभुळगाणी जंगल भागात चरण्यासाठी गेला असता त्यांचेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. कांबळे यानी सदर घटनेबाबत वनविभागाकडे रीतसर तक्रार केली आसल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी एन.डी. पाटील यानी सांगितले.

बिबटया प्रवण क्षेत्रांत सावधगीरीने कसे वागावे
१)वनक्षेत्रांत गुरे चरण्यास सोडू नये. 
२) गोठ्यांत (वाडयांत) रात्री उजेड असावा.
३ ) वन्य प्राणी , भेकर, रानडुक्कर ससे यांची शिकार करू नये ही बिबटयांची खाद्य आहेत.
४) रात्रीच्या वेळी शेतात जाताना सोबत कंदील, बॅटरी, दणकट काठी, पाळीव कुत्रा सोबत न्यावा.
-एन.डी.पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी , म्हसळा

तालुक्यात विष घालून गौवंशाची हत्या करणे ( मेंदडी) , शौवंश पळवून नेणे ( आंबेेत), मोठ्या प्रमाणातील बिबटयाचे हल्ले या सर्व गोष्टीत शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हया सर्वच गोष्टीत शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार आहोत. मेंदडी व आंबेत येथील घटनेबाबत लौकरच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेणार आहोत.
-महादेव पाटील, अध्यक्ष म्हसळा तालुका हींदू, संघटना

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा