२०१९ चा खासदार मीच : सोबत आता श्रीवर्धन चा आमदार सुध्दा शिवसेनेचाच असणार: अनंत गिते.


म्हसळ्यांत गीते यानी केली ४० लक्ष रुपयांची उद्घाटन  व  भूमीपूजन
संजय खांबेटे : म्हसळा 
        केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व रायगडचे खासदार अनंत गीते यानी आज म्हसळे तालुक्यात कांदळवाडा,खरसई व तुरूंबाडी येथे ४० लक्ष रुपयांचे विविध लोकोपयोगी कामांची उद्घाटन  व  भूमीपूजन केले. यामध्ये कांदळवाडा येथील साठवण टाकी व. तुरूंबाडी येथील सामाजिक सभागृह यांची उद्घाटन व कांदळवाडा समाजमंदीर, खरसई साठवण टाकी, समाज मंदीर व अंर्तगत रस्ते असे रु ४० लक्ष चे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाले . या सर्व कामाना  ना. गीते,खा. अनिल देसाई व खासदार संजय राऊत यांचा निधी उपलब्ध झाल्याचे ता.प्रमुख शिर्के यानी सांगितले. यावेळी श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे . शिवसेना तालुका प्रमूख नंदु शिर्के, माजी सभापती .महादेव  पाटील, रवींद्र लाड , अनंत नाक्ती, सरपंच धोंडीबाई चाळके,पांडूरंग बने अनिकेत पानसरे ,अमित महामुनकर , गणू बारे , हेमंत नाक्ती, महिला आघाडी प्रमूख सौ.रीमाताई महामुनकर , सौ.निशाताई पाटील,तसेच चारही विभागातील विभाग प्रमुख , शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संखेने उपस्थित होते.

  केंद्रीय मंत्री गीते यानी तीनही ठिकाणी २०१९ च्या लोकसभेत मी सलग ७ व्यांदा रायगडचे प्रतिनिधीत्व करणार आहे असे आत्मविश्वासाने सांगत मला श्रीवर्धन विधानसभेत सुध्दा शिवसेनेचाच प्रतिनिधी निवडून आणायचा आहे असे सांगत उपस्थित शिवसैनीकाना  व  बहुसंख्य कुणबी समाजाला बळ दिले.तुरूंबाडी येथील कोळी बांधवांचा "महादेव कोळी" या बाबत केंद्र स्तरावर विशेष पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले , रायगड मतदार संघात कुणबी समाजाची शक्ती फार मोठी आहे, त्यांची सार्वजनिक जिवनातील सकारात्मकता व प्रामाणिक पणाची सर्वांनाच जाणीव आहे मी कुणबी समाजासाठी २.५ कोटी खर्च करून लौकरच मुंबईतील  मुलुंड येथे सुसज्ज वसतीगृह बांधणार असल्याचे सांगितले. शिवसेनेच्या आजच्या कार्यक्रमांत
शिवसैनिकांसमवेत कुणबी समाजातील कार्यकर्ते बहुसंखेने होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा