● पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे शिवसेना -भाजपा कार्यकर्त्यांच्यात नाराजीचे सूर
● काँग्रेसनी केले राष्ट्रवादीला टार्गेट
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
दिघी माणगाव पुणे या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे माणगाव - म्हसळा- दिघी या मुख्य टप्प्यांत महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची फसवणुक करीत असल्याच्या तक्रारीत वाढ होऊ लागल्याने काँग्रेसने राज्य शासन व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ (MSRDC) विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेत टार्गेट करायचे ठरविले त्याच उद्देशाने म्हसळा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ मोईज शेख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मीटींग झाली जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, म्हसळा शहर अध्यक्ष रफी घरटकर, फझल हलदे, महादेव पाटील, सदाअप्पा विचारे, अजित कळस,नसिर मिठागरे, शौकत घरटकर आदी पदाधिकारी , बहुसंख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. या रस्त्यांबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यापुढे माणगांव , म्हसळा व श्रीवर्धन या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांची कमेटीची स्थापना करुन आंदोलनातील तीव्रता वाढविण्यात येणार आहे.
जिल्हयात वाकण -खोपोली रस्त्यातील शेतकऱ्यांसाठी रस्तावर उतरणारे नेते , माणगाव - दिघी रस्त्यासाठी का रस्त्यावर येत नाही अशीही टिका ( राष्ट्रवादी कॉंग्रेस व सुनील तटकरे यांचे नाव न घेता ) कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
कॉंग्रेसच्या नेतृत्वा खालील आंदोलनातील भाजपा : शिवसेना सहभागा मुळे राजकीय फटाके बाजी
शिवसेनेचे म्हसळा तालुका उपाध्यक्ष अनंत (भाई) कांबळे, बाळकृष्ण म्हात्रे, नवनीत पारेख व भाजपाचे रेवली सरपंच अनंत कांबळे, गोवींद भायदे, महेश पाटील ही राज्य शासनातील सत्तारूढ पक्षांतील मंडळी राज्यशासनाच्या विरुद्धच्या आंदोलनात सक्रीय कशी हा म्हसळा नाक्यावरील चर्चेचा विषय होता .तालुक्यात राजकीय दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरला आहे .N.C.P. ने शेतकऱ्यांचे बाजूने रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. शिवसेना तालुक्यात दोन नं. चा राजकीय पक्ष आहे . त्यानी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलनांत सहभागी होण्यापेक्षा स्वताच नेतृत्व करणे आवश्यक आसल्याचे आभ्यासू शिवसैनीकांचे मत आहे.
भारतीय जनता पक्ष तालुक्यात नव्याने आपले स्थान निर्माण करत असतानाच राष्ट्रीय, प्रांत पातळीवर आपला १ नंबरच्या शत्रूचे नेतृत्व स्वीकारत आंदोलनात सहभागी होणे हे तालुक्यात पक्ष वाढीसाठी घातक आसल्याची चर्चा आहे.

Post a Comment