स्पर्धेत म्हसळा ,श्रीवर्धन ,महाड या तीन तालुक्यातून 110 स्पर्धकांनी घेतला सहभाग : म्हसळा तालुका स्पर्धा विजेता
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
व्यक्तीच्या उत्कर्षासाठी ज्ञान लालसा आवश्यक आहे .ज्ञाना सोबत शिस्तप्रियता ,आत्मविश्वास,जिद्द व कठोर मेहनत खेळातून प्राप्त होते .व या गुणांमुळे व्यक्ती आपले आयुष्य यशस्वीपणे घडवू शकतो असे प्रतिपादन जयराज सुर्यवंशी यांनी चम्पियन्स कराटे क्लब श्रीवर्धन आयोजित ०६ व्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित विदयार्थी वर्गास संबोधित करतांना केले.
देश प्रगतीसाठी देशाचा तरुण सक्षम ,दृढनिश्चयी व कणखर असणे आवश्यक आहे .तरुणांनी विविध खेळयांचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे .खेळामुळे मन एकाग्र बनते .आपल्या मना मध्ये संघ भावना वाढीस लागते .त्यामुळे व्यक्ती आपल्या सोबत इतरांचा सकारात्मक दृष्टीने विचार करतो .राष्ट्र निर्मिती साठी सर्वांनी एकत्र येऊन संघ भावनेने काम करणे गरजेचे आहे .प्रतिभावंत तरुण पिढी देशाची खरी संपत्ती आहे .आपण सर्वांनी काळानुसार खेळा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे .कारण आजमितीस खेळा सुद्धा चांगले भवितव्य निर्माण झाले आहे. आपल्या मधील क्षमता आपण पुर्ण पणे विकसित करून दर्जेदार खेळ खेळू शकतो .खेळाडूंना सर्व क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आजमितीस योग्य मार्गदर्शन व जिद्द या बाबींची गरज आहे. आपल्या मधील कलागुणांना वाव द्या .शालेय शिक्षणा सोबत खेळ हा आयुष्याचा महत्वाचा घटक बनवा .सुर्यवंशी यांनी स्पर्धक खेळाडू शी संवाद साधताना पुढे असे म्हंटले की कराटे हा प्रचंड मानसिक व शारीरिक क्षमता निर्माण करणारा खेळ आहे .व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण व परिपक्व बनवण्यात कराटे खेळ महत्वाची भूमिका बजावत असतो .स्पर्धेतील जय पराजय तुम्हांस सक्षम बनवत असतो त्यामुळे तुम्ही अनुभव संपन्न बनता .व अनुभवाच्या शिदोरीवर यशाचे शिखर चढणे सोपे असते . माझ्या मुलाने खेळात करियर करावे असे मला मनोमन वाटते असे जयराज सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात म्हंटले .
या स्पर्धेत म्हसळा ,श्रीवर्धन ,महाड या तीन तालुक्यातून 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .या स्पर्धेत उत्कृष्ठ खेळाडू प्रसाद खांडेकर ,धनश्री तोडणकर,कमलेश रटाटे,तेजस्वी वालन्ज यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच सिद्धी सावंत ,मयुरी वैद्य, सुमित महाडिक ,कृतार्थ कोलथरकर, अनिकेत साखरे या सिनियर खेळाडूंचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला .
सदर कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, नगरसेवक अनंत गुरव , उपस्थित होते .स्पर्धा आयोजनात चॅम्पियन कराटे क्लब च्या प्रसाद विचारे ,शैलेश ठाकूर ,अविनाश मोरे ,प्रसाद सावंत ,तुषार घाडगे ,अभय कळमकर व रितेश मुरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे .

Post a Comment