दिवेआगरमधून पुणे , मुंबई शिवशाही सुरू करा ; श्रीवर्धन तालुक्यातील प्रवासी व पर्यटकांची मागणी



दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन आगारातून श्रीवर्धन - भिवंडी व श्रीवर्धन - मुंबई नालासोपारा अशा बसेस बस सुरू केल्या मात्र , या दोन्ही बसचा मार्ग बोर्लीपंचतन असुन दिवेआगर मार्गे चालवाव्या अशी मागणी स्थानिक प्रवाशी व पर्यटक करत आहेत . खासगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर अत्याधुनिक अशा शिवशाही बस सुरू केल्या आहेत . मात्र , पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाच्या श्रीवर्धन तालुक्यातील आगाराला फक्त बोटावर मोजण्या इतक्याच बस दिलेल्या आहेत . वातानुकूलित बस . आकर्षक डिजिटल बोर्ड , पुशबँक आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था , मोबाइल चार्जर , सीसीटीव्ही , अनऊन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिष्ट्ये असलेल्या या बसेस सुरू आहेत . श्रीवर्धन ते म्हसळा या मार्गाने बस नेण्याऐवजी ती बस दिवेआगर मधून बोर्लीपंचतन मार्गे सरू केल्यास अधिकच्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येईल . या मार्गावरील पुणे , मुंबई कडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे दिवेआगर दिघी पर्यटकांना सोईचे होईल . अनेक प्रवाशांनी शिवशाही बस बोर्लीपंचतन मार्गे सुरू करावी अशी मागणी केली आहे . 

पर्यटन हंगाम सुरू...
साधारण ऑक्टोबर पासुन पर्यटन हंगाम सरू होतो . त्यातच दिवाळीमध्ये पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दा पाहायला मिळतं . दिवेआगर मधून पुणे तसेच मुंबई जाण्यासाठी थेट बस असाव्या अशी मागणी जोर धरू लागली . मोठ्या प्राणावर येणार्या पर्यटकांमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते . 


श्रीवर्धन आगारात शिवशाही बस कमी प्रमाणात आहेत . नियमित ठराविक मार्गावर बस सुरू आहेत . प्रवाशांच्या मागणी पत्रानुसार वरिष्ठांना कळवले जाईल . त्यानुसार लवकरच श्रीवर्धन शेखाडी मार्गे दिवेआगर हुन पुणे तसेच मुंबई जाण्यासाठी शिवशाही बस सुरू करण्यात येईल . 
- रेश्मा गाडेकर , आगार व्यवस्थापक , श्रीवर्धन 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा