दंगल नियंत्रक पथकाच्या जवानांचे कौतुकास्पद कृत्य ; सोशल मीडियावर होतंय जोरदार कौतुक


श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरात गणपती विसर्जनासाठी तैनात केलेल्या माणगाव येथील दंगल नियंत्रक पथकाच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराज  चौकातील महाराजांच्या प्रतिमेचा मान ठेवून चौकातील समितीच्या शेड मध्ये बूट काढून प्रवेश केला . त्याचे चित्र सध्या श्रीवर्धनमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . सोशल मीडियाद्वारे या जवानांच्या या कृत्याचे कौतुक केलं जात आहे . शिवाजी चौक येथील या शेडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . अन्यवेळी या शेडमध्ये तालुक्यातून शहरात बाजारपेठेत येणारी मंडळी विश्रांती घेण्याकरता बसतात . तर काही जण पेपर वाचनासाठी देखील या ठिकाणी बसतात . अनेकवेळा काही लोक पादत्राणे घालूनच आतमध्ये बसताना दिसतात . यावरून यापूर्वी वादाचा देखील मुद्दा उपस्थित आहे . मात्र झाला गणपती मिरवणुकीत तैनात करण्यात आलेल्या माणगाव येथील , दंगल नियंत्रण जवानांनी आपले बूट पथकाच्या काढून या शेडमध्ये प्रवेश करून जवानांबद्दलचा आदर प्रत्येकाच्या मनात आणखी वाढवला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा