संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील घनसार कॉम्लेक्स परीसरांत घरफोडी संशयावरून नागरीकानी पकडलेला लियाकत मुन्ना खान वय ३० रा. पहिली पाडा, रुम नं. २ आनंद नगर चाळ , ट्रॉम्बे मुंबई याला म्हसळा पोलीसानी गु.र.नं. २९ / २०१८ मध्ये चोरीला गेलेल्या वस्तु हस्तगत करण्यात यश मिळविले . अन्य तशाच पध्दतीच्या गुन्ह्यांतील चोरीचा तपास करण्यासाठी संबधीत आरोपीला ७ दिवसाची P.C. मिळाली होती, तपासात अन्य गु.र.नं २८भा.द.वी.४५४, ३८० प्रमाणे असणाऱ्या चोरी बाबत काहीही निष्पन्न न झाल्याने संशयीत आरोपीची सुटका झाल्याचे P. S.I. दिपक डूस यानी सांगितले.
फोटो :म्हसळा घनसार कॉम्पलेक्स येथील नागरीकाना संशयीत चोर आढळल्यावर त्याला नागरीकानी पोलीसांच्या ताब्यात दिले.


Post a Comment