रायगड : विशेष प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हे अभियान संपुर्ण देशात सुरु आहे . यामध्ये ग्रामीण भागातील सार्वजनिक स्वच्छतेची व्याप्ती व नागरिकांचा मोबाईल अॅपवरील एस एस जी अठरा बाबतच्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत . तसेच केंद्रीय समितीकडून ग्रामपंचायत मधील सार्वजनिक स्वच्छतेच्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्यात येत आहे . आपल्या रायगड जिल्हयाचे मानांकन देशपातळीवर वाढविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी , अधिकारी , कर्मचारी , महाविद्यालयीन विद्यार्थी आदिंनी उत्तम प्रतिसाद दिला आहे यापुर्वी आपल्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे देशपातळीवर अपंग कल्याण पुरस्कार रायगड जिल्हयास प्राप्त झाला आहे तसेच राज्यस्तरावर पंचायतराज पुरस्कार , संत गाडगेबाबा पुरस्कार , निर्मलग्राम पुरस्कारामध्येही रायगडचे काम कायम अग्रेसर राहिले आहे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये ऑनलाईन अभिप्राय नोंदविण्यात रायगड जिल्हा कोकण विभागात अव्वल आहे . आता स्वच्छ सर्वेण ग्रामीण २०१८ मध्ये रायगडचा नावलौकीक देश पातळीवर वाढविण्यासाठी मोबाईलवर प्ले स्टोअर्स वर जाऊन एस एस जी अठरा ऑप डाऊनलोड करून रायगड जिल्हयाची निवड करावी . स्वच्छतेबाबात विचारलेल्या प्रश्नांबाबत आपले अभिप्राय उत्स्फूर्तपणे नोंदवावेत . या करिता गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करावेत . गावस्तरावरील पंचायतराज सदस्य , सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांचे मदतीन ३१ ऑगस्टपर्यंत मोहिम स्वरुपात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवुन मोबाईल अँप व्दारे अभिप्राय नोंदविण्याची मोहिम यशस्वी करावी .

Post a Comment