संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
बहिण भावाच्या पवित्र नात्यांला भरारी देणाऱ्या रक्षाबंधन दिनी म्हसळा तालुक्यातील न्युइंग्लिश स्कूल ,नेवरूळ या शाळेतील विद्याथ्यानी अगळा -वेगळा रक्षाबंधन साजरा केला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्षांसहीत पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. न्युइंग्लिश स्कूल नेवरूळ या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील मुलींनी उपस्थित मुलांना राखी बांधून गोड खाऊचे वाटप केले.यांनंतर नविन उपक्रम सादर करीत परिसरातील वृक्षांना राखी बांधून वृक्ष व पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेतली.बहिण आपल्या भावाला राखी बांधून जशी संरक्षण करण्याची हमी मागते तसे आपण सर्वांनी आपल्या परिसरात येणारे प्रत्येक वृक्ष हे आपले मित्र, भाऊ आहेत ही भावना ठेऊन त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे असे मत श्री . व्हि.पी.पवारसर यांनी कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.यानंतर रक्षाबंधनाचे महत्व हे काळाची गरज आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना श्री.एस. व्हि. सदलगे यानी करून दिली .

Post a Comment