म्हसळ्यातील खड्डयांचे आव्हान : एकाच वेळी शासन व आंदोलकांना खड्यांनी दिले आव्हान ; दिवसें दिवस खुड्याच्या संखेत वाढ



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

म्हसळा शहर व तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासी, वाहतुकदार, पर्यटक कंटाळले असताना विविघ संघटना व संस्था आंदोलन केले. परंतु आता खड्यानी  एकाच वेळी शासन व आंदोलकाना आव्हान दिले  आहे. म्हसळा शहर S.T.Stand परीसर, नवे नगर, दिघी नाका,दिघी रोड, M.S.E.B. परीसर, ताज बेकरी आशा सर्वच भागांत खड्डे नव्याने तयार झाले आहेत .तर दुसरीकडे म्हसळयांतील खड्डयांच्या आंदोलनाने , सतत खड्डे भरूनही पुन्हा नव्याने व जास्त प्रमाणात निर्माण होणाऱ्या खड्डयाने  शासन मात्र त्रस्त झाल्याचे चित्र आहे.
      गोकुळ अष्टमी, गणपती या सणापूर्वी शासनाने रस्त्याला पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे, त्यासाठी पावसाळी वापरण्यात येणारी डांबर वापरण्यात यावी कोणत्याही परीस्थितींत जांभा दगड वापरण्यात येऊ नये अशी जनतेतून मागणी  होत आहे.

       तालुक्यात आजपर्यंत अवजड वाहतुक सेना, शिवसेना, रिक्षा चालक मालक संघटना व माजी सभापती महादेव पाटील, मुसद्दीक ईनामदार व कार्यकर्ते आशा विविध मंडळीनी खड्डयांबाबत आंदोलन , मोर्चा , निवेदन या लोकशाही संकेताच्या गोष्टी पार पाडल्या आसल्या तरी त्या विषयी M.S.R.D.C किंवा P. W.D. विशेष गांभीर्याने घेत नसल्याची जाणीव जनतेच्या व विविध संघटनांच्या लक्षांत आली आहे. 


जनतेतून सर्वस्थरांतुन खड्डांबाबत आंदोलन होत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष, श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार, विधान परीषदेमध्ये प्रतिनिधीत्व करत आसलेले लोकप्रतीनिधी, केंद्रात असणारे खासदार ही मंडळी आवाज का उठवत नाही याबाबत हल्ली नागरीकांच्यात विशेष चर्चा होत आहे.


श्रीवर्धन , म्हसळा तालुक्यातील सर्व राज्य मार्ग हे १९ टन वाहतुकीसाठी आसल्याचे सा .बां. विभाग महाड यांचे पत्र माझ्याकडे आहे, या भागांतून दिघी पोर्टची होणारी वाहतुक ही किमान २५ ते ३५ टन क्षमतेची आहे ती रस्त्याचे क्षमतेपेक्षा जास्त असल्याने वाहतुक तात्काळ थांबविणे, त्यांच्यावर गुन्हे नोंदविणे अशी शासनाने भूमिका घेणे जरुरीचे आहे.
-महादेव पाटील माजी सभापती पं.समिती , म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा