आता शिवसेना स्टाईलने दिघी पोर्ट व्यवस्थापनाला वठणीवर आणणार - जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांचा इशारा
> >
> > ● म्हसळ्यात शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन यशस्वी
> >
> > ● जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांनी केले मोर्चाचे नेतृत्व
> >
> > ● माजी आमदार तुकाराम सुर्वे यांची उपस्थिती
> >
> > ● आंदोलनात बॅनरसाठी थर्माकोलचा वापर
> >
> > ● माजी सभापती महादेव पाटील यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग नाही
> >
> > ● आंदोलन बघण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित
> >
> > ------------------------------ -----
> > दिघी पोर्ट ..हाय हाय
> >
> > प्रशासन कोणाचे .. विजय कळंत्रीचे की जनतेचे
> >
> > बघताय काय... सामिल व्हा...
> >
> > अशा घोषणांनी परीसर दुमदुमला
> > ------------------------------ -
> > म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
> >
> > > म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन, दिघी, माणगाव या मुख्य रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. अनेक महिने झाले तरीही हे खड्डे भरण्याचे काम संबंधित विभागाकडून करण्यात आलेले नाही त्यामुळे प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. याबाबत संबंधित खात्याचे मंत्री व प्रशासनातील अधिकारी यांना अनेक वेळा लेखी निवेदने देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच यासंदर्भात संबंधिताना 15 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच दिघी पोर्ट व प्रशासन विरोधात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते म्हसळा दिघी नाका पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.
> > यावेळी मोर्चाचे नेतृत्व करीत असलेले दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शिवसैनिकांना आक्रमक शैलीत संबोधित करताना सांगितले की दिघी पोर्ट व्यवस्थापक किंवा प्रशासन आणि राज्य सरकार यांना दिघी पोर्टची ओव्हर लोड वाहतूक आणि माणगाव - म्हसळा - दिघी रस्त्याची झालेली दुरवस्था याबाबत संबंधितांना आता लेखी निवेदने द्यायची नाहीत तसेच मोर्चे, आंदोलन, उपोषण करायचे नाहीत तर आता शिवसेना स्टाईलने दिघी पोर्ट व्यवस्थापनाला व प्रशासनाला वठणीवर आणायचे असा रोखठोक इशारा जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी दिला असून या लढ्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असेही ठणकावून सांगितले. तसेच माणगाव ते दिघी रस्त्याच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट ज्या जे.एम.म्हात्रे कंपनीने घेतली आहे त्यांच्या कामाच्या पद्धतीने नाराजी व्यक्त करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी शिवसेना पक्षाचे वतीने मागणी करून दिघी माणगाव रस्त्याची अवस्था बिकट असताना सुध्दा दिघी पोर्टची ओव्हर लोड अवजड वाहतूक चालू आहे. अनेक वेळा यांची प्रशासनाकडे तक्रार करून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत सर्व तक्रारी प्रशासनाकडे वारंवार करून सुध्दा कोणतीही ठोस कारवाई प्रशासन करीत नाही. त्यामुळे यातून हेच सिद्ध होते कि प्रशासन मोठा अपघात होऊन जिवीतहानी होण्याची वाट पाहत आहे त्याचबरोबर प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे तसेच वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन दिघी पोर्टच्या मूजोर ट्रेलर चालकांवर कारवाई का करीत नाही यामूळे दीघी माणगाव रस्त्यावर प्रवास करणारे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जिव मूठित घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर सर्व नियम धाब्यावर बसवून व पायदळी तुडवून भर दिवसा हि ओव्हर लोड अवजड वाहतूक चालूच असते याचा तालुक्यातील नागरिकांनाच नव्हे तर शाळेय विद्यार्थ्यांना हि त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मुजोर ट्रेलर चालकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आणि प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांच्या सूरक्षेच्या जबाबदारी खातर प्रशासना विरोधात म्हसळा तालुक्यातील शिवसेना, अवजड वाहतूक सेना, युवासेना यांच्या वतीने आज स्वातंत्र्य दिन असूनही 15 ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितली आहे.
तसेच माजी आमदार तुकाराम सुर्वे व श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिघी पोर्ट अवजड वाहतुकीचा व रस्त्याची झालेली दुरवस्था याचा त्रास सर्वच नागरिकांना होत आहे तसेच या मार्गावरून सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नेहमीच प्रवास करीत असतात त्यामुळे कोणतेही राजकीय स्वार्थ न बाळगता जनतेच्या समस्या लक्षात घेऊन सर्व पक्षीयांनी दिघी पोर्ट व प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून खूप मोठे जन आंदोलन उभे केले पाहिजे तसेच शिवसेना पक्षाच्या दिघी पोर्ट अवजड वाहतूक विरोधी लढ्यात सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन केले.
> > यावेळी आंदोलनास जिल्हा प्रमुख रवी मुंडे यांसह श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे, श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर, क्षेत्र संघटक रविंद्र लाड, म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख नंदू शिर्के, अनिल नवगणे, जेष्ठ सल्लागार गणेश वाजे, उप तालुका प्रमुख अनंत कांबळे, वाहतूक सेना अध्यक्ष श्याम कांबळे, युवासेना अधिकारी अमित महामुनकर, सचिन महामुनकर, संतोष सुर्वे यांसह युवा सेना, अवजड वाहतूक सेना पदाधिकारी, महिला, तरुण उपस्थित होते.
● आंदोलनात बॅनरसाठी थर्माकोलचा वापर ● युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेचा विसर
15 ऑगस्ट रोजी म्हसळ्यात शिवसेना पक्षाचे वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात बॅनर साठी थर्माकोलचा वापर करण्यात आला होता त्यामुळे राज्यात प्लास्टिक बंदी ची जी संकल्पना मांडली होती त्या शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेचा व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आदेशाचा खुद्द शिवसैनिकांनाच विसर पडला असल्याची चर्चा जोरदार सुरू होती.
● आंदोलन पाहण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित
शिवसेना पक्षाचे वतीने काढण्यात आलेला मोर्चा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आय या पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांना पाहून बघताय काय.. सामील व्हा ! अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. यानंतर प्रेक्षकांच्या भूमिकेत असलेल्या इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी हातवारे करून आंदोलनाला दाद देत होते.
माजी सभापती महादेव पाटील यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांचा आंदोलनात सहभाग नाही...
दिघी पोर्ट अवजड वाहतूक व दिघी माणगाव रस्त्याची दुरवस्था तसेच म्हसळ्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे याबाबत सर्वात प्रथम माजी सभापती तथा शिवसेना पक्षाचे तालुका नेते महादेवराव पाटील यांनी वैयक्तिक दिघी पोर्ट व प्रशासनाला अनेक लेखी निवेदने दिली होती परंतु 15 ऑगस्ट च्या आंदोलनात महादेव पाटील प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत तसेच महादेव पाटील यांच्यासह म्हसळा शहरातील पदाधिकाऱ्यांचा आणि शिवसेना पक्षाची सत्ता असलेल्या अनेक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग नव्हता त्यामुळे म्हसल्यातील शिवसेना संघटनेच्या एकी बाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली असून उलट-सुलट चर्चा करण्यात येत आहे.

Post a Comment