संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
आरोग्य सेवेच्या सातत्याने तक्रारी होत असताना संबधीत बाबींचा आढावा घेण्यासाठी आ. अनिकेत तटकरेंनी म्हसळा ग्रामिण रुग्णालयात अचानक भेट दिली असता आमदारांना पाहून वैदकीय अधिकाऱ्यासहीत कर्मचाऱ्याची धावपळ झाली.
आमदारांच्या येण्याची कोणतीही पुर्व सुचना नसल्याने रुग्णालयातील वैदकीय अधिकाऱ्यासहीत कर्मचाऱ्याची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले. आ. अनिकेत तटकरे यांनी या परिस्थितीतही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत एक समन्वयाची भुमिका घेत रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष अली कौचाली, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष नाझीम हसवारे, शाहीद उकये व युवा कार्यकर्ते नईम दळवी उपस्थित होते. रुग्णालयाला दिलेल्या या भेटीमध्ये आ. महोदयांच्या लक्षात आले की,२०१४ साली लोकार्पण होऊन देखील तालुक्यात आलिशान रुग्णालय असले तरी त्यामध्ये अपुरी यंत्र सामुग्री, अपुरी आरोग्य यंत्रणा, अपुरा स्टाफ असल्याने सरकारी यंत्रणेलाही खाजगी सेवेवरच अवलंबून राहावे लागत आहे.यानंतर आ. तटकरे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गवळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधुन रुग्णालयात अपुरी यंत्रसामग्री, कर्मचारी वर्ग, असुविधा, रुग्णांना होणाऱ्या गैरसोई बाबतची माहिती दिली या सर्वाची पुर्तता ठरावीक काल मर्यादेत करण्या संदर्भात सुचना केल्या. तसेच आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांची भेट घेऊन इथल्या अडचणी विषयी चर्चा करून लवकरात लवकर त्यांची पुर्तता करुन जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळवून देण्या संदर्भात प्रयत्नशील राहीन असे तटकरे यानी उपस्थिताना सांगितले.
म्हसळा ग्रामिण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव व असुविधांमुळे रुग्णांना वारंवार गैरसोईंना सामोरे जावे लागते. लाईट नसताना जनरेटरची सुविधा नसल्याने रुग्णालयात अनेकवेळा टॉर्चच्या प्रकाशात प्रसुती करण्याची वेळ येथिल डॉक्टरांवर येत असते.
ग्रामिण रुग्णालयाचे उद्घाटनाला स्थानिक शिवसेनेचा विरोध होता. तरी तत्कालीन रायगड जिल्हयाचे पालक मत्री व श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार सुनिल तटकरे यानी श्रीवर्धन चा 7/12 माझा आहे सांगत उद्घाटन केले. शिवसेना तब्बल ४ वर्ष सत्तेत असुनही व आरोग्यखाते शिवसेनेकडे असुनही त्यानी काहीच केले नाही व आ. अनिकेत तटकरेनी उचललेले सकारात्मक पाऊल कौतुकाचे आहे. अशी उपस्थित रुग्णांची चर्चा व प्रतिक्रिया होती
म्हसळा ग्रामिण रुग्णालयात अचानक भेट दिल्यानंतर आरोग्य सेवेचा आढावा घेताना आ. अनिकेत तटकरे व अन्य दिसत आहेत.


Post a Comment