श्रीवर्धन येथील लोकन्यायालयात १३० प्रकरणे निकाली...


श्रीवर्धन : शहर वार्ताहर
तालुका विधी सेवा समिती , श्रीवर्धन व म्हसळा आणि वकील संघटना , श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीवर्धन येथील मे . न्यायालयात दि . १४ जुलै १८ रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी श्रीवर्धन येथील दिवाणी न्यायाधीश मा . न्या . ए . एम . मुजावर वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते . या लोकन्यायालया समोर दिवाणी १४ , फौजदारी १९३ अशी प्रकरणे ठेवण्यात आली होती . त्यापैकी दिवाणी ३ व फौजदारी ३८ प्रकरणे निकाली निघाली . व त्यांचेकडून रु . ११ , ४३ , १०० / - रक्कम वसुली झाली . तसेच वादपूर्व खटल्यांमध्ये बँकांची ३०९ , महा वितरण व भारत संचार निगम लि . ची ३९७ व ग्राम पंचायतींची ( घरपट्टी , पाणीपट्टी योजना इ . ) ११० प्रकरणे ठेवण्यात आली होती . त्यापैकी अनुक्रमे ११ , ९ व ६९ प्रकरणे निकाली निघून त्यापोटी एकूण रू . ५ , २६ , ८०२ / - ची वसुली झाली . वरील लोकन्यायालयासाठी अॅड . वावेकर व . ठोसर यांनी पंच म्हणून काम पाहिले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा