म्हसळा : अरुण जंगम
आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षराची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये.खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होते तो याच ठिकाणी मात्र म्हसळा शहरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर असणा-या तोंडसुरे,चिखलप,मेंदडी कोळीवाडा,मेंदडीअदिवासीवाडी,रोहीणी,पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थीती पाहील्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. यापैकी काही अंगणवाड्यांना तडे गेले असुन ही ईमारत धोकादायक असतानाही चिमुरडे जिव मुठीत घेवुन अक्षरे गिरवित आहेत.
एकीकडे शासनाचा डिजीटल इंडीयाचा उदोउदो होत असताना या गावातील अंगणवाडीचे विद्यार्थी जीव मुठीत घेवुन अक्षरे गिरवीत आहेत एकुणच या अंगणवाड्यांची परिस्थीती पाहता कसा होणार डिजीटल इंडीया असा प्रश्न येथील नागरीक करीत आहेत.
म्हसळा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांची देखभाली अभावी दुरावस्था झाली आहे.विशेषत: ग्रामी ण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक प्रतिनिधिंसहीत प्रशासनाने ही दुर्लक्ष केल्याने या अंगणवाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे.पावसाळ्यात अनेक अंगणवाड्यांच्या शेड व छतासाठी बसविलेल्या पत्र्यांमधुन पाणी पडत असल्याने अँगणवाडीमध्ये येणा-या अनेक छोट्या बालकांची गैरसोय होत आहे.मात्र या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खुप जुन्या व जिर्ण झाल्या असुन विशेषत: मेंदडी गावातील कोळीवाडा व अादीवासीवाडी वरील ईमारती धोकादायक असल्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी देवुन सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधि व प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील तोंडसुरे या गावातील अंगणवाडीची ईमारतच धोकादायक झाली असुन संपुर्ण अंगणवाडीच्या ईमारतीस तडे जावुन इमारत धोकादायक झाली आहे पर्यायी म्हणुन ज्या गावातील घरामध्ये बसविले जाते ते पाहील्यावर खरोखरच सुरक्षित आहे की नाही अशी कल्पना ही मनात होते परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळ दुरुस्तीचे अथवा पुर्ऩबांधणिचे सर्व प्रस्ताव अद्यापही धळ खात पडले आहेत.त्यामुळे या चिमुरड्या बालकांना बसण्यासाठीही व्यवस्थित जागा नसल्याने अंगणवाडी सेविका व बालविकासप्रकल्प अधिकारी यांनी एक वर्षापुर्वीच दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तसेच सदर ग्रामपंचायतीला देवुन सुद्धा कोणत्याही प्रकारची इमारतीच्या डागडुजीची तरतुद न केल्याने पर्यायाने या चिमुरड्यांना भाड्याने घेतलेल्या आवारात बसुन अक्षरे गिरवावी लागत आहेत.ईमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधि व ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.मुख्यपर्यवेक्षिका तसेच बालविकास विस्तार अधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित धोकादायक अंगणवाड्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये विज जोडणीसाठीही प्रश्न उपस्थीत केले आहेत परंतु याकडे कोणीही गांभिर्याने विचार करीत नाही.
म्हसळा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सात अंगणवाड्यांची ईमारती धोकादायक असुन नव्याने उभारणीची मागणी करुन एक वर्षाचा कालावधी संपुन सुद्धा शासकीय स्तरावरुन कोणत्याही प्रकारची हालचाल केल्याचे दिसत नाही.
म्हसळा तालुक्यातील विशेषत:ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या इमारतींकडे स्थानिक लोकप्रतिनिधिंसहीत प्रशासन पाहत नसल्याने अंगणवाड्यांच्या इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. तोंडसुरे,मेंदडी कोळीवाडा तसेच पानवे,चिखलप,मेंदडी अदिवासीवाडी त्याचप्रमाणे इतर गावातील अंगणवाड्या चिमुकल्यांसाठी इमारत मृत्यूचा पाश ठरू पाहात आहे. त्यानंतरही बाल विकास विभाग अद्यापही गप्प का असा प्रश्न सामान्य नागरीक करीत आहेत. त्यापलिकडे बाल विकास विभाग व ग्रामपंचायत परस्परांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे त्यामुळे अशा धोकादायक इमारतीत अंगणवाडीचे कामकाज सुरू असून स्थानिक प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मेंदडीत दोन अंगणवाड्या कार्यान्वित आहे. यातील एक अंगणवाडी गावाच्या अदिवासीवाडीवर आहे, तर दुसरी अंगणवाडी गावातील कोळीवाड्यामध्ये आहे. मागील दोन वर्षांपासून या अंगणवाडीची इमारत धोकादायक स्थितीत आली आहे. इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहे, तर घुशीने उकीर काढला असून बसण्याची सोय राहिलेली नाही. या अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसविण्यात येऊ नये असे आदेश मेंदडी ग्रामपंचायती मार्फत अधिकाºयांनी दिले आहे. ही अंगणवाडी इतरत्र हलवावी, असे सांगण्यात आलेआहे. अंगणवाडीची इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नाही. मात्र या इमारतीला जमिनदोस्त करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कुठलाही प्रयत्न होताना दिसत नाही. मागील दोन वर्षांपासून केवळ पाठपुरावा सुरू आहे, असे ठेवणीतले उत्तर दिले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत गंभीर नाहीत.काही ठीकाणी प्रचंड घाण असताना हा शालेय पोषण आहार तयार होतो. या पोषण आहारातून मुलांना बालकांना धोका होवुशकतो आता ही समस्या कधी निकालात निघते याची प्रतीक्षा म्हसळा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना लागली आहे. याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवू नये, असा आदेश दिला आहे. ही इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यांच्यास्तरावर याबाबत कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले. या टोलवाटोलवीतच ह्या धोकादायक इमारती अद्यापहीकायम आहेत.
● म्हसळा तालुक्यातील अंगणवाड्या धोकादायक इमारतींना गळती
● अनेक अंगणवाड्यांमध्ये विज जोडणी देखील नाही
● विद्यार्थ्यांच्या जिवास धोका
● लोकप्रतिनिधिंसह स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
----------------------------------------
"सदर धोकादायक अंगणवाड्यांचे प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे पाठविण्यात आले असुन सदर बाबतीत पाठपुरावा सुरुआहे.प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास तात्काळ काम सुरु करण्यात येईल.
वाय.एम.प्रभे
गटविकास अधिकारी म्हसळा पंचायत समिती
-------------------------------
"अंगणवाड्यांच्या बाबतीत पाठपुरावा सुरुअसुन बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येणा-या मासिक सभेमध्ये याच विषयावर पाठपुरावा करुन मंजुरी आणणार."
मधुकर गायकर
उपसभापती पंचायत समिती म्हसळा
--------------------------
" तालुक्यातील पर्जन्यमान पाहता सदर अंगणवाड्यांमधील सेविकांना अतिवृष्टीमध्ये मुलांना सदर ईमारतीमध्ये न बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मागिल दोन वर्षापासुन सदर अंगणवाड्यांच्या डागडुजीसाठी अथवा नविन ईमारत बाधणी साठी प्रस्ताव पाठविण्यात आले असुन अद्यापही शासन स्तरावरुन कोणतीही मंजुरी न मिळाल्याने बालकांना सुरक्षित ठिकाणी बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेणुका पाटील
मुख्य पर्यवेक्षिका तसेच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी
----------------------------------

Post a Comment