दिघी : गणेश प्रभाळे
श्रीवर्धन तालुक्याला पुणे , मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरीता धोकादायक ठरत आहे . श्रीवर्धन - दिघी मार्गावरील शिस्ते गावाजवळ असलेल्या दिवेआगर फाट्याजवळचा रस्ता खचला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्ष मुळे या खड्डयात अपघात होण्याची शक्यता आहे काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला . त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे . पावसाळ्यात संभाव्य मार्ग खचण्याची शक्यता लक्षात घेता खचलेल्या मार्गावर भराव टाकणे अपेक्षित होते परंतु तहान लागण्याआधी विहीर खणण्याइतके बांधकाम खाते सजग नाही . या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात.
रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही फलक लावण्याचे सौजन्य ही बांधकाम खात्याने दाखवले नाही . शिवाय खड्ड्यात भराव देखील टाकला नाही . रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हा पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये जा असते त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकरदुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे रस्ता सरळ असल्याने दिवेआगर फाट्याजवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो . सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा असे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
Post a Comment