योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट १३ वी जिल्हा योगासन स्पर्धा २०१८ ; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..

योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट आयोजित १३ वी जिल्हा योगासन स्पर्धा २०१८ रविवार दि.०८ जुलै २०१८ रोजी संपन्न होत असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट तर्फे करण्यात आले आहे.


प्रती,
–-–------------------------
-------------------------------
महोदय,
योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार, महाराष्ट्र योगा असोसिएशन च्या अधिपत्याखाली, योगा असोसिएशन ऑफ रायगड डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने  रविवार दि.०८ जुलै २०१८ रोजी १३ व्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी,पनवेल येथे आयोजित करण्यात येत आहे, रायगड जिल्यातील एकूण १५ तालुक्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत,ही स्पर्धा वय वर्ष ८ते ११, ११ते १४,१४ते १७,१७ते२१,२१ते२५,२५ते३५, व ३५ वर्षा पुढील अशा प्रकारे  मुले/पुरुष,  मुली/महिला अशा एकूण १४ वयोगटात घेतली जाणार आहे, या निवडलेल्या ४२ स्पर्धकांचा संघ १७ ते १९ ऑगस्ट२०१८ रोजी ( आत्मा मलिक ध्यानपिठ,एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोकमठाण,ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर,महाराष्ट्र)येथे होणाऱ्या३७ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधीतत्व करतील. या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या ४२ स्पर्धकांचा संघ नोव्हेंबर २०१८ रोजी पटियाला(पंजाब) येथे होणाऱ्या ४३ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

वेळा पत्रक :
नाव नोंदणी : सकाळी ७ ते८.३०
उदघाटन : सकाळी ८.३० ते ९

योगासन स्पर्धा सकाळी  ९ ते  दु.३ वा.
बक्षीस वितरण : दु. ५  ते  ६ वा.पर्यंत

नियम व अटी :
स्पर्धकांना आपल्या वयोगटातील सिल्याबसमधील १० आसनांपैकी लॉटरी पध्दतीने किंवा पंचांनी निवडलेली कोणतेही ५ आसने करावी लागतील. सर्व वयोगटाचा सिल्याबस www.yogafederationofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आसनांचा कालावधी प्रत्येकी ३० सेकंद असेल.
स्पर्धकांनी जन्मतारखेच पुरावा व पासपोर्ट साईज ४ फोटो आणावेत. ३१ डिसेंबर २०१८ ही तारीख वयासाठी ग्राह्य धरली जाईल. प्रत्येक स्पर्धकास सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक गटातून ३ स्पर्धक निवडले जातील, विजेत्या स्पर्धकांना प्राविण्यप्रमाणपत्र व मेडल दिले जाईल.

संपर्क :
श्री स्वप्नील वारंगे९८२१८९९८७२
श्री हेमंत पयेर ९८६०६०१७३६
श्री यतीराज पाटील ९९२११७१७००

स्पर्धा प्रमुख :
श्री.उत्तम मांदारे ८७७९२६८८५१

 स्पर्धा कमेटी :
श्री किशोर शिताळे ९२६००४१२२७
श्री बाळकृष्ण म्हात्रे ८४४६२३८९४६
श्री जनार्दन कांबळे ९२२८८५५६१५
सौ हेमांगी मेंदडकर ९१५८८१९१८५


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा