म्हसळा : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल नेवरुळ येथे नवगतांचे स्वागत . मोफत पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप समाजसेवक प्रदिप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . प्रदीप कदम यांच्याकडून इयत्ता आठवीमधील सर्व विद्याध्यना प्रत्येकी चार वही व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच इयत्ता दहावी वर्गाचा १०० टक्के निकाल लागल्यामुळे सर्व शिक्षकांचे शाल , श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाला नेवरूळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामदास रिकामे गाव अध्यक्ष राजेंद्र लटके , तुकाराम दिवेकर , रामचंद्र लटके , मुलीधर काते , सूरज महागांवकर , शुभम लाड सायली प्रदिप कदम , शिक्षकवर्ग , सदलगे एस व्ही , पवार व्ही . पी . , जाधव आर एन . , कालेकर एच . आर आदि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment