श्रीवर्धन : वादळी वाऱ्याने घरांचे पत्रे उडाले...


श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरातील जीवना कोळीवाड्याठिकाणी रविवारी दुपारी सुटलेल्या सोसाट्याच्या वादळी वाच्याने अनेक ठिकाणचे पत्रे उडाले . त्याचप्रमाणे काही ठिकाणी घराची कौले उडुन मोठे नुकसान झाले आहे श्रीवर्धन शहरामध्ये पावसाने हजेरी लावली असून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस पडत आहे . मात्र समुद्राने तर रौद्र रूप धारण केले आहे मोठमोठ्या लाटा किनाच्यावर आदळत आहेत . त्यातच रविवारी जीवना कोळीवाडा या ठिकाणी सोसाट्याचा वारा आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे असलेले गोदामाचे पत्रे उडुन लाकडी खांबही उबुन काही अंतरावर पडलेले दिसत आहे त्याचप्रमाणे जीवना कोळीवाडा जेटीच्या ठिकाणी अनंता चाफेकर यांच्या सलुनच्या दुकानांच्या छपराचे सर्व पत्रे उडाले . व्यापारी मुजमील यांच्या ऑफिसचे सर्व पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे . तसेच जीवना कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवासाठी बांधण्यात आलेल्या शेडचे सर्व पत्रे लोखंडी पाईपासह उडून गेल्याने पत्रे तर फुटून गेलेच शिवाय लोखडी पाईपाचा तर चंदामेंदा झाला आहे . वाच्याचा प्रचंड वेग असल्यामुळे काही घरांची कौलेही उडून गेली . मात्र ह्या वादळी वेगाच्या वाच्याने कोणतेही जीवितहानी झालेली नाही . संध्याकाळी उशीरापर्यंत वाच्याचा वेग हा कमी झाला नव्हता शिवाय पावसाची तर रिमझिम सतत चालू होती . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा