देशाच्या प्रगतीत सामाजिक ऐक्य महत्त्वाची भूमिका बजावते - परशुराम कांबळे पोलीस निरीक्षक श्रीवर्धन


श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते

भारत देशातील लोकशाही चा सामाजिक ऐक्य हा कणा आहे .देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने सर्व भारतीयांना दिलेले आहे .त्यामुळे देशात अनेक जाती धर्माची लोक गुण्यागोविंदाने राहतात .भारत देशातली सामाजिक सलोखा देश प्रगतीसाठी नितांत आवश्यक आहे .असे प्रतिपादन परशुराम कांबळे पोलीस निरीक्षक यांनी केले.
    श्रीवर्धन तालुका शिवसेनेने आयोजित  इफ्तार कार्यक्रम प्रसंगी कांबळे यांनी बोलतांना श्रीवर्धन तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे कौतुक केले .देशाच्या प्रगतीत साठी सहिष्णू व समता पुर्ण समाजाची  बांधणी आवश्यक आहे .देशातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहात सामील झाल्यास देशाची प्रगती सहज शक्य आहे .असे कांबळे यांनी म्हंटले .श्रीवर्धन शहर हे संवेदनशील शहर समजले जाते पूर्वी सामाजिक ऐक्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते परंतु आजमितीस चित्र पालटले असून जनता सुज्ञ व जागरूक बनली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे .जातीय तेढ नवनिर्मितीस बाधक असते .रोजा पावित्र्याचे प्रतीक आहे .ईश्वराने दिलेल्या आयुष्याचा उपयोग सकारात्मक कामा साठी करणे हा ईश्वराचा संदेश आहे  .असे प्रतिपादन परशुराम कांबळे यांनी श्रीवर्धन बाजारा मध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले .

  सदर कार्यक्रमाचे आयोजन जुनेद दस्ते ,प्रीतम श्रीवर्धनकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले .कार्यक्रम प्रसंगी श्री नवगिरे, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रतोष कोलथरकर यांनी मनोगत व्यक्त केले .सदर च्या कार्यक्रमास शिवसेना पक्षाचे स्थानिक पातळीवर चे    दादा  मांडवकर, अरुण शिगवण ,महादेव पाटील ,करणं पाटील, अनंत गुरव याच्या सह  असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा