श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित : मदगड किल्ला , कुसमेश्वर विकासाच्या प्रतीक्षेत प्रशासनाचे दुर्लक्ष...


श्रीवर्धनमधील ऐतिहासिक पर्यटन स्थळे दुर्लक्षित : मदगड किल्ला , कुसमेश्वर विकासाच्या प्रतीक्षेत प्रशासनाचे दुर्लक्ष...

पायाभूत सुविधांचा अभाव ; रोज़गारासाठी स्थानिकांचे स्थलांतर 
 श्रीवर्धन : संतोष सापते

श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळाले आहे नारळ , बागा व अथांग सागर ऐतिहासिक पार्श्वभूमीबरोबरच तीर्थक्षेत्र यामुळे पर्यटकांची श्रीवर्धन तालुक्यात नेहमीच गर्दी असते . पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरी भागाचा विकास करण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत . तालुक्यातील मदगड व कुसमेश्वर ही त्याचीच उदाहरणे म्हणता येतील मदगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील किल्ला आहे . जुन्या काळी मदगड किल्ल्यावरून वडवली , बोर्लीपंचतन , वेळास , कुडगाव , दिघी या गावांची टेहळणी केली जायची त्यामळे संरक्षणाच्या दृष्टीने मदगड महत्वाचा किल्ला गणला जाई श्रीवर्धन ते वांजळे २५ किमी अंतर आहे . बोर्लीपंचतन या शहरापासून ५ किमी अंतरावर दाट वनराईत ७७० फूट उंचीवर मदगड वसलेला आहे . स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था व पुरातत्व दुर्लक्षामुळे किल्ल्याची अवस्था भयाण झाली आहे मात्र तरीही जुन्या काळातील काही पाऊलखुणा याठिकाणी निदर्शनास येतात . किल्ल्यावर सर्वत्र जंगलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे मदगड किल्ल्याच्या पायथ्याशी वांजळे ही धूप ग्रामपंचायत आहे गौळवाड़ी , हनुमानवाडी व बौद्धवाडी यांची मिळून वांजळे ग्रामपंचायत असून लोकसंख्या पाचशेच्या जवळपास आहे . परंतु स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही . आजमितीस गावात शाळाही नाही . पाच वर्षांपूर्वी गावात प्राथमिक शाळा होती . आज शाळेच्या इमारतीची अबस्था बिकट असून आवारात मोकाट गुरांचा संचार आहे . गावातील मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे . गावात वाहतुकीची व्यवस्था नाही . दिवसात एसटीच्या दोन फेन्या होतात , त्या व्यतिरिक्त पर्याय नाही . स्थानिक तरुणांनी किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊलवाट तयार केली आहे . परंतु दाट वनराईमुळे पाऊलवाट शोधणे कठीण जाते . मदगड किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता असल्यास पर्यटक याठिकाणी भेट देऊ शकतील त्यासोबत किल्ल्यावर पाणी , निवारा व वाहतुकीची साधने उपलब्ध केल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकते . पर्यटन विकास व पुरातत्व विभागाने लक्ष दिल्यास मदगड या ऐतिहासिक वास्तूचे जतन शक्य आहे . 

श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल येथे कुसमेश्वराचे पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे . मंदिराची उभारणी गोल घुमटाकार असून मुख्य मंदिराच्या परिसरात पांडवकालीन विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे . तसेच अनेक भग्नावस्थेतील विविध देवदेवतांच्या मूर्ती परिसरात आढळून येतात . कुसमेश्वर ( देवखोल ) ते श्रीवर्धन २० किमीचे अंतर असून म्हसळा धनगरमलई मार्गे देवखोल १५ किलोमीटर अंतरावर आहे बोर्ली पंचतन ते देवखोल ९ किमी अंतर आहे दिवेआगरला भेट देणारा पर्यटक वर्ग कुसमेश्वर व मदगडला भेट देऊ शकतो . परंतु वाहतूक व्यवस्था व कुसमेश्वर आणि मदगडविषयी पर्यटकांना माहिती उपलब्ध करण्यात पर्यटन विभागास अपयश आले आहे . पर्यटनाचा विकास झाल्यास वांजळे , दांडगुरी , वावे, बोरला , नागलोली , धनगरमलई या गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल , परिणामी गावातून मुंबई - पुणे या शहराकडे रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होईल . पर्यायाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध उदरनिर्वाहया प्रश्न मिटेल . 


राज्य शासनाने ६०० कोटी रुपयांची तरतूद रायगड़ किल्ला संवर्धनासाठी केली ही चांगली बाब आहे त्या सोबत इतर किल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे . रायगड़ जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात प्रथमच स्थानिक किल्ले संवर्धनासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आम्ही केली आहे . आगामी जिल्हा परिषदेच्या नियोजनाच्या बैठकीत मदगड व कुसमेश्वर या दोन्ही पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधा व विकासाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल . तसेच स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न अग्रणी असेल . - अदिती तटकरे , अध्यक्षा , जि . प . 


मदगड किल्ल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे . त्यामुळे आपला ऐतिहासिक ठेवा जोपासला  जाईल व भूमिपुत्रांना रोज़गार उपलब्ध होईल . आम्ही चार वर्षांपूर्वी त्यासंदर्भात प्रयत्न केला होता . - श्याम भोकरे , माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य 

मदगड किल्ला पर्यटनस्थळ  म्हणून विकसित होणे गरजेचे आहे . दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून मदगड किल्ल्यासंदर्भात विचारणा झाली होती . आमच्याकडे नैसर्गिक जलस्रोत असल्याने बारमाही पाणी जनतेस उपलब्ध आहे.
 - जी . एस . सुर्वे ग्रामसेवक वांजळे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा