बोर्ली पंचतन शहरात वाहतूकीचा बोजवारा ; स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजनांची अनास्था तर पोलिसांचे डोळ्यांवर हात

बोर्ली पंचतन शहरात वाहतूकीचा बोजवारा ;  स्थानिक प्रशासनाच्या उपाययोजनांची अनास्था तर पोलिसांचे डोळ्यांवर हात


दिघी : वार्ताहर 

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर अनेक अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यामुळे शहरातील वाहतूक व्यास्थेचा बोजवारा उडाला आहे वाहनांची वाढणारी संख्या , नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे इतर रस्त्यांप्रमाणेच या प्रमुख मार्गावरील वाहतुकीची समस्या बिकट बनली आहे . मुख्य रस्त्यावर दुभाजक नसल्याने या समस्येत अधिक भर पडत आहे बोर्ली एसटी स्टेंड ते पोस्ट ऑफिस या रस्त्यावर दिवसभर मोठया प्रमाणात वाहतुकीची वर्दळ पहायला मिळते . या वर्दळीला अनेक कारणांनी अडथळे निर्माण होतात रस्त्याच्या दुतर्फ विविध प्रकारचे व्यावसायिक असल्याने तेथे खरेदीसाठी सतत गर्दी असते . तसेच या रस्त्यावर स्वतंत्र पाकिंगची व्यवस्था नसल्याने लोक रस्त्यावरच वाहने पाकिंग करतात . दुकान गाळ्यातील व्यापार्यांशिवाय किरकोळ विक्रेते , फेरीवाले , भाजीविक्रेतेही रस्त्याच्या दुतर्फ दुकान थाटलेली असतात . 

अधिक वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी...
शहरात प्रवास करताना नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात . याबाबत नागरिकांना विचारण्यात आले . त्यानुसार वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले . त्यानंतर बेशिस्त वाहनचालक , रस्त्यावर पाकिंग केलेली वाहने , चालण्यास फुटपाथ नाही , रस्ता ओलांडताना अडचण या समस्या येत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले . वाहतुकीला शिस्त लावावी यासाठी जास्त रकमेचा दंड वसूल करावा असे सर्वाधिक ( ४९ टके ) नागरिकांनी म्हटले आहे त्यानंतर रस्त्यावर जास्त पोलीस ठेवा , नियम तोडल्यास परवाना रद्द करावा , अशी मागणी नागरिक करीत आहेत . 

बेकायदेशीर पार्किगवर कारवाई करावी...
 बोलपंचतन शहर आता पर्यटनामुळे चांगलेच चर्चेत येत आहे दिवेआगर , दियी , श्रीवर्धन या पर्यटन स्थळी जाण्यास याच शहरातून जावे लागते . मात्र रस्त्यानवर असलेल्या बेकायदेशीर पार्किग व थांब्यांकडे कुणी अधिकारी नियमानुसार कारवाई करेल का अशी विचारणे होत आहे व्यापार्यांच्या गाडया भर रस्त्यात उभ्या असतात त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्रय वाहतूक पोलीस दाखवणार का ? असा सवाल नागरीक करीत आहेत . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा