श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत असल्याचे समोर आले आहे . येथील एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणार्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतुक विस्कळीत झाली आहे याचा त्रास ग्रमीण भागातील प्रवाशांना होत आहे श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गावे वाहतुकीसाठी एसटी प्रवासावर अवलंबून आहेत . हरिहरेश्वर , दिघी व म्हसळा या मुख्य रस्त्या व्यतिरिक्त सगळीकडे एसटीचीच वाहतूक चालते . त्यापोटी एस टी महामंडळाला चांगले व नियमित उत्पन्न मिळते . आता गर्दीचा हंगाम सुरू उत्पन्न आहे . वाहतूक श्रीवर्धन आगारातून त्यामळे जादा सुरू आहे ही आनंदाची बाब आहे ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीसाठी एसटी सोडून दुसरा पर्याय नाही . त्याचा गैरफायदा एसटी अधिकारी घेत असल्याचे बोलले जात आहे श्रीवर्धन एसटी डेपो हा ग्रामीण व शहरी वाहतुकीसाठी ओळखला जातो . या आगारातून मुंबई , नालासोपारा , बोरिवली , पुणे ही लांब पल्ल्याची वाहतूक चालते . श्रीवर्धन तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता ग्रामीण वाहतूक अतिशय अवघड आहे चालक व वाहकांना कामगिरी लावणारे वाहतूक निरीक्षक उदय हाटे यांनी कुठला ही विचार न करता तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची मुक्कामाची बस बंद केली आहे . त्यामुळे नानवेल , सर्वा , आदगाव , वेळास , धनगरमलई , बोर्ली , नागलोली या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत . त्यांना बस प्रवासाशिवाय वाहतुकीचे दुसरे साधन उपलब्ध नाही . तसेच रोहिणी , तुरबाडी , काळसुरी , वारळ या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे
गाडीचा चालक आजारी असल्याचे कारण केले पुढे...श्रीवर्धन एसटी डेपोला बऱ्याच कालावधी नंतर सक्षम व हुशार आगार प्रमुख मिळाल्या आहेत त्यांनी मात्र या गाडीचा चालक आजारी असल्यामुळे एसटी सोडण्यात नाही आली असं कारण सांगितले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सेवा बंद करण्यामागचा वाहतूक निरीक्षकांचा हेतू स्पष्ट झालेला नाही .
ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी मी एसटीच्या वाहतूक अधिकाच्यांच्या मनमानी कारभाराविषयी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे .
- शाम भोकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
मी अनेक वर्षापासून एसटीचा नियमित प्रव सी आहे परंतु श्रीवर्धन डेपो तील वाहतूक अधिकाच्यांनी तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची बस सोडली नाही . त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत . आता एसटीवर अवलंबन राहणे चूकीचे वाटत आहे . एसटीच्या अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे महामंडळावरील विश्वासाला तडा गेला आहेत .
- गजानन विलनकर प्रवाशी आदगाव

Post a Comment