म्हसळा : वार्ताहर
नवतरुण मंडळीने भक्तीभावाने ईश्वराच्या चरणी लीन होतानाच ज्या आईवडिलांनी लहानाचे मोठे करण्यासाठी पराकाष्ठा केली , चांगले जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवला त्या आईवडिलांच्या उपकाराची फेड करण्यासाठी त्यांची इमानेइतबारे सेवा करणे क्रमप्राप्त असल्याचे प्रांजळ मत मुंबई येथील मागाठणे मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हसळा तालुक्यातील मौजे पाटी येथे श्री राधाकृष्ण मंदिर जीर्णाद्धार उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना सांगितले . जयदीप क्रीडा मंडळ आणि पाटी ग्रामस्थांनी गावात देणगीदारांचे मदतीमधून सुमारे ५० लक्ष रुपये खर्चाचे भव्यदिव्य श्री राधाकृष्ण मंदीराचे जिणद्धार केले आहे . मंदिर जिणद्धाराचे स्वागत कार्यक्रमाला आमदार प्रकाश सुर्वे यांचे समावेत व्यासपीठावर रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक , जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे , पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे , सरपंच राधिका काते , मा जी सरपंच राजाराम धुमाळ जयदीप मंडळ अध्यक्ष प्रदीप दिवेकर , मुंबई मडेळ निवासी अध्यक्ष विठ्ठल दिवेकर , यादव समाज उन्नती संस्था अध्यक्ष अशोक काते , सामाजिक कार्यकर्ते समीर बनकर , लक्ष्मण कांबळे , शांताराम गायकर , गोवेळे विभाग गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे पाटी गाव अध्यक्ष शांताराम कांबळे वासुदेव दिवेकर , अनंत रिकामे , सुनिल महाडिक , श्री मंगेश मुंडे , सुदाम माळीसर , मनोहर वाजे , प्रकाश लाड , प्रकाश धुम ळ , आत्माराम दिवेकर , महिला मंडळ अध्यक्षा आदी पंचक्रोशीतील म न्यवर , ग्रामस्थ आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमात मंदिर जिणद्धार नामफलक पाटीचे अनावरण आमदार प्रकाश सुर्वे यांचे हस्ते करण्यात आले . तीन दिवस संपन्न मंदिर जीर्णाद्वार सोहळ्यात श्री गणेश , मारुतीराय मुर्ती सह श्री राधाकृष्णाची सुबक मुर्तीची स्थापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली . या औचित्याने मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा होमहवन , पुजा पाठ अभिषेक , काकड आरती , महा आरती , भजन , किर्तन , कळा , क्रीडा सत्कार , महाप्रसाद आणि सांस्कृतिक असे विविध यानिमित्ताने कार्यक्रम संपन्न झाले .
Post a Comment