रिलायन्स कप क्रिकेट स्पर्धेत म्हसळा तालुक्याची विजयी सलामी...

रिलायन्स कप क्रिकेट स्पर्धेत म्हसळा तालुक्याची विजयी सलामी

रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशन आयोजित रिलायन्स कप क्रिकेट स्पर्धा व जिल्हा निवड चाचणीच्या उद्घाटनिय सामन्यात म्हसळा तालुका क्रिकेट अससोसिएशनने वरसोली विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय प्राप्त करून विजयी सलामी दिली.म्हसळा संघातील प्रत्येक खेळाडूने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करू वरसोली संघाला 52 धवांवर गुंडाळले त्यानंतर तेजस लेपकर व रतीश वाघरे यांनी दिलेल्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला या खेळाडूंना म्हसळा तालुका क्रिकेट संघाचे सचिव हेमंत पयेर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व खेळाडूंचे म्हसळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष  तथा जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष नाझीम हसवारे,उपाध्यक्ष निलेश मांदाडकर,म्हसळा तालुका क्रिकेट संघटनेचे मुंबई संघटक महेश शिर्के,अंकुश गाणेकर, डॉ किशोर कोकाटे,किशोर धोकटे, विजय बोर्ले, निलेश पास्टे, महेश डांगे, हेमंत रामाणे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा