शुक्रवारी महाड येथे विरपत्नी मेळावा
भारतीय सैन्यदलात किंवा सशस्त्र दलात असणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या अधिकारी जवानास कोणत्याही युद्धात किंवा युद्धजन्य् परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कारवाईत वीरमरण आलेले जवान अथवा अधिकाऱ्यांच्या विधवा पत्नीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास जमीन प्रदान करणेसाठी महाराष्ट्र शासनाने, जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे)(सुधारणा) नियम 2018 मध्ये सुधारणा करणेबाबत तसेच त्याबाबत मार्गदर्शन करण्याकरीता शुक्रवार दि.27 रोजी सकाळी 10 वा. सैनिक मुलांचे वसतिगृह, नवे नगर, महाड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील सर्व युद्धविधवा व कायदेशीर वारसांनी या मेळाव्यास उपस्थित राहून आपल्या मागण्या लेखी स्वरुपात द्याव्यात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.

Post a Comment