देवघर येथे रामनवमी निमित्त साईभंडाऱ्याचे आयोजन
म्हसळा -सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनांक 25/03/2018 रोजी मौजे देवघर ता . म्हसळा येथील श्री साई मंदीरा मध्ये श्री साईनाथ सेवा ट्रस्ट च्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . सदरदिवशी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी ६ .०० वा काकड आरती सकाळी ६ .३०. वा अभ्यंगस्नान दुपारी १२ .००. वा श्रीराम जन्मोत्सव दुपारी १२ .३०वा माध्यान्ह आरती दुपारी १ते४ . साईभंडारा सायं . ४ते ५ श्री कर्जाईदेवी प्रासादीक भजन मंडळ चिखलप ता म्हसळा येथील बुवा श्री .दिलीप शिंदे यांचे सुस्वरभजन व सायंकाळी ७ . ३० सांज आरती असे कार्यक्रम होणार आहेत तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहून श्री साईभंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमती आशा शिवाजी चाळके यांनी केले आहे

Post a Comment