बोर्लीपंचतन तलाठी कार्यालय उरले नावापुरते ; शेतकर्यांना मनःस्ताप, तहसिलदारांनी लक्ष देण्याची मागणी...

बोर्लीपंचतन तलाठी कार्यालय उरले नावापुरते ; शेतकर्यांना मनःस्ताप, तहसिलदारांनी लक्ष देण्याची मागणी...

बर्लिपंचतन
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील तलाठी कार्यालय नावापुरतेच उरले आहे तेथे तलाठी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत . गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकन्यांच्या अनेक नोंदी रखडल्या असून त्यांची पूर्तता केव्हा होणार , याकडे शेतकन्यांचे लक्ष लागून राहिले आहे तलाठी कार्यालयातील ७ / १२ आणि ८ अ उतारे संगणीकृत ऑनलाईन बनविण्याचे काम श्रीवर्धन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू आहे . संगणीकृत ७ / १२ आणि ८ अ बनविण्याच्या नावाखाली तलाठी गेल्या काही महिन्यांपासून तलाठी बोर्लीपंचतन येथील कार्यालयात चुकून कधीतरी भेटत आहेत . बोर्लीपंचतन परिसरातील शेतकर्यांनी व्यवहार केलेल्या जमिन खरेदी विक्रीस वारस हक्क नोंद , सातबारा उताच्यावरील नाव कमी करणे , क्षेत्र करणे , नाव चढवणे , हक्क सोड आदी कामे गेले वर्षभर रखडलेली आहे . तलाठ्याकडे अनेकवेळा हेलपाटे मारूनी तलाठी कोणतेच काम वेळेत करत नसल्याने बोर्ली , कापोली , शिस्ते येथील ग्रामस्थ वैतागले असून येथील कार्यालय तरी कशाला खुले करता ? असा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला जात आहे


एजंट लोकांना तत्काळ सही...
वाढत्या पर्यटनमुळे श्रीवर्धन तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे त्यामुळे जमिनी खरेदी विक्री करण्यासाठी एजंटनी महसूल कार्यालयाला घेरा घातल्याचे दिसते . विशेष म्हणजे दिवसारा नुसत्या फोनद्वारे त्यांची कामे महसूल यंत्रणा करते . सामान्य जनतेला मात्र ' ऑनलाईन ' च्या नादात वेठीस धरले जाते . तहसिलदारांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे

मी गेले २ महिने फेन्या मारतोय . सलग चार दिवस सुट्टी आहे दरवेळी आलो की तलाठी नसतात . सहीसाठी मुंबईहुन नातेवाईक आले आहेत . किती तरी फेऱ्या वाया गेल्या आहेत . मात्र महसूल यंत्रणेकडून काम होत नाही .
 - -विरेंद्र भायदे , कापोली " 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा