म्हसळ्यामध्ये आज धाविरदेवांच्या यात्रेचा उत्साह...
म्हसळा, प्रतिनिधी
म्हसळ्यातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या , सर्वजाती धर्माच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाच्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाच्या श्री धाविरदेवमहाराजांची यात्रा आज , ३० मार्च रोजी संपन्न होत आहे . दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी श्री धाविर मंदिराच्या प्रांगणात भरली जाते . या दिवशी चांदीचे मुखवटे , वस्त्रालंकार घालून ग्रामदेवतेला सजविण्यात येते . दुपारपासूनच ग्रामदेवता , बापूजी , काळभैरव , काळेश्वरी , जोगेश्वरी , झोलाई या देवतानांही विशेष वस्त्रालंकाराने सजविण्यात येऊन चांदीचा मुखवटा वगैरे अलंकार परिधान करून प्रसन्न व आनंदी उत्साहात वतनदारांची स्थापना केली जाते . रात्री आठच्या सुमारास पालखीने श्री शंकर मंदिरा शेजारीच वास्तव्य करून बसलेल्या बापूजींना वाद्य वाजंत्रीसह यात्रेच्या ठिकाणी मानाने आणले जाते . परतीच्या वेळी पालखीत बापूजींच्या वास्तव्यामुळे पालखीचे वजन आपोआप वाढते अशी पूर्वापार आख्यायिका आहे , त्याची सत्यता पडताळण्यासाठी व श्रद्धेने आणि भावनेने ने - आण आणण्यासाठी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते . यात्रेदिवशी संपूर्ण गावाभोवती वेश ( शिव ) बांधण्याची प्रथा असून गावात वाईट प्रवृत्ती , रोगराई , संकटे येऊ नये तसेच ग्रामस्थांना उत्साही ठेवण्यासाठी गावाची शिव बांधून ग्रामस्थ व गावातील इतर वतनदार यांच्यासह हरिजन समाजाचे मानकरी विशेष प्रार्थना करतात . पूर्वी सुमारे ७० वर्षांपूर्वी ८४ गावातील सजविलेल्या काठ्या ढोल बाजांच्या गजरात येत होत्या परंतु नजिकच्या काही वर्षांपासून विजेचे पोल , वीज , टेलिफोनच्या तारांच्या विखुरलेल्या जाळ्यांमुळे यात्रेकरुच्या आनंदात विरजण पडल्यासारखे झाले आहे यात्रेला ८४ काठ्या येत होत्या , आता तो आकडा जेमतेम १७ ते २० वर येऊन थांबला आहे यात्रेला सर्वप्रथम केलटे गावातील काठिला मानाचे स्थान असून म्हसळा ग्रामदेवतेच्या काठीने केलटे गावातील काठीला मानवदंना देण्यात येते . रात्रभर चालणाच्या या यात्रेत अगदी लहानापासून वृद्धांपर्यंत सर्वच जण सहभागी होतात . यात्रेच्या मध्यरात्रीपासून ( रात्री बारा वाजले पासून ) ग्रामदेवतेची पालखी निघते आणि संपूर्ण शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात येते व नवसांची फेड नवीन नवस केले जातात .

Post a Comment