श्रीवर्धन न . प . तर्फे पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुली प्रारंभ...


 श्रीवर्धन : श्रीवर्धन नगरपरिषदे तर्फे २२ फेब्रुवारीपासून पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुलीसाठी नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे , उपाध्यक्ष जितेंद्र सातनाक आदींच्या हस्ते श्रीमंत पेशवे प्रवेशद्वारापाशी श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला . यावेळी पर्यटन विकास सभापती वसंत यादव , गटनेते बाळकृष्ण चाचले , नगरसेवक किरण केळकर , नगरसेविका दिशा नागवेकर , नगरसेविका आराई , अन्य नगरसेवक , मुख्याधिकारी अर्चना दिवे , अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता . गेल्या ३ - ४ वर्षात श्रीवर्धनला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे . त्यामुळे साहजिकच स्वच्छता व पर्यावरण नियंत्रणाचे प्रश्न वाढले आहेत . त्यादृष्टीने वरील को लागू करणे न . प . ला गरजेचे वाटत होते सदर फी लहान मोटर , कार , टैक्सी , जीप व तत्सम वाहने दैनिक पास रु . २० , मिनी बस , टेम्पो व तत्सम वाहन दैनिक पास रु . ५० बस , ट्रक , टेंकर्स , ट्रेलर्स व जड मोटर वाहने दैनिक पास रु . ७५ दैनिक पासप्रमाणे वरील सर्व वाहनांसाठी मासिक व वार्षिक पासांचीही व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पर्यावरण कीमधून तिनचाकी वाहने , सर्व एस टी . बसेस , महाराष्ट्र शासनाची , निमशासकीय वाहने , केंद्र शासनाची वाहने , केवळ वर्तमान पत्रे व दूध वाहतूक करणारी वाहने , रुग्णवाहिका व शववाहिका , रायगड पासिंग ( एम एच . ०६ ) वैयक्तिक वापराची वाहने यांना सूट देण्यात आली आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा