म्हसळा : सुशील यादव
सातारा येथे पार पडलेल्या चँपियन कराटे क्लब आयोजित राष्ट्रीय चँपियन कराटे कप २०१७ मध्ये म्हसळा येथील ९ वर्षीय विद्यार्थी मंदार मनोज देशपांडे याने एक सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. व म्हसळा तालुक्याचे नाव उज्वल केले. सातारा येथील चँपियन कराटे क्लब ने राष्ट्रीय स्तरावरचे कराटे सामने आयोजित केले होते. या स्पर्धेत नारंगी पट्यातील स्पर्धेत देशपांडे याने कुमेती मध्ये एक सुवर्ण तर काता मध्ये एक रौप्य अशा दोन पदकांची कमाई म्हसळा तालुक्याला करून दिली. मंदारने या आधीही कराटे च्या अनेक स्पर्धांमध्ये याप्रकारची कामगिरी केली आहे. मंदारच्या या यशाबद्दल म्हसळा तालुक्यातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
Post a Comment