जागतिक बॉडी बिल्डींग स्पर्धेत सुहास खामकरचे सुयश. सुवर्ण पदकाची थोडक्यात हुलकावणी .!

Image result for सुहास खामकर



प्रतिनिध,
होँगकोँग येथे पार पडलेल्या ओलम्पीया २०१७ जागतिक बॉडी बिल्डींग स्पर्धेत मुंबईकर सुहास खामकरने रौप्य पदक जिंकले आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकला. सुहासने अटीतटीची लढत देऊनसुद्धा सुवर्ण पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली.
आज सकाळी १० वाजता, जेट एअरवेजने सहकारी सुशील पवार समवेत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानातळावर सुहासचे आगमन झाले आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. या आनंदाच्या भरात जंगी स्वागत झालेल्या सुहासने विविध वाहीन्यांना दिलखुलास मुलाकत दिली.
प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधताना सुहासने सांगितले की, या यशामागे गेल्या अनेक वर्षांची खडतर मेहनत आहे. आई वडील, गुरुजन, पत्नी, भावंडे, मित्र, हितचिंतक या सगळ्यांना यशाचे श्रेय आहे असे कृतज्ञपणे सांगितले.
Image may contain: 4 people, people smiling, people standing and flower
                                                                                 तमाम भारतीयांना आणि मुख्यतः युवा पिढीला संदेश देतांना सुहासने म्हटले की, यश संपादन करायचे असेल तर केवळ झोपेत स्वप्न न पाहता ते कृतीत उतरविण्यासाठी कठोर परिश्रम करणे हिताचे आहे. यामुळे आपल्या कुटुंबाचे, गावाचे राष्ट्राचे नाव उज्वल होईल, ज्याद्वारे मिळणारा आनंद द्विगुणित राहतो.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा