देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त ( दि.31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस व त्याच दिवशी स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंगळवार दि.31 रोजी सकाळी 8 वा. राष्ट्रीय एकता दौड अलिबाग शहरातून आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवार दि. 31 रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत कुलाबा किल्ला ते बस स्थानक या मार्गावर Run For Unity अर्थात राष्ट्रीय एकता दौड होईल. त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळात प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवसाची व संकल्प दिनाची सामुदायिकरित्या शपथ होईल. यावेळी शाळास्तरावर सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्र दर्शन,नाट्य,संगीत स्पर्धा,गावांतील प्रतिष्ठांची भाषणे होतील. सायंकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे नियंत्रणात Long March (परेड) आयोजित करण्यात आली आहे.
तरी या कार्यक्रमांस शहरातील नागरिक, विद्यार्थी विद्यार्थिनी, खेळाडू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी,डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
Post a Comment