.
मेंदडी - दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त गुणवान शिक्षकांना रायगड जिल्हा परिषदेमार्फत गौरविण्यात येत असून यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारळ येथील शिक्षक संतोष बाळाराम शेवाळे यांना सी डी देशमुख सभागृह रोहा येथे प्रदान करण्यात आला.
संतोष शेवाळे हे अतिशय कल्पक असे शिक्षक असून म्हसळा तालुक्यात त्यांची सलग २० वर्षे सेेवा झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक काम केले असून त्यांचे यशस्वी विद्यार्थी आज सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. अध्यापनाचे काम तळमळीने करून विद्यार्थ्यांबद्दल आत्मियता दाखवत सतत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपडणारे असे व्यक्तीमत्त्व आहे शैक्षणिक कार्याबरोबर समाजासाठी उल्लेखनीय सहकार्य, डिजिटल शाळेसाठी योगदान, कला, क्रिडा, सांस्कृतिक, उत्तम वक्ते इत्यादी गुुणांमुळे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. त्यांच्या यशामध्ये शाळा व्यवस्थापन समिती वारळ, साळविंडे ,गोंडघर ,खरसई यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्याच बरोबर पंचायत समिती म्हसळा सभापती उज्ज्वला सावंत , उपसभापती मधुकर गायकर , पं. सं. सदस्य छाया म्हात्रे , संदिप चाचले जि. प. सदस्य बबन मनवे , जि. प. सदस्या धनश्री पाटील, गट विकास अधिकारी निलम गाडे , गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे , केंद्र प्रमुख कोळेकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून म्हसळा तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.
Post a Comment