दिपावली सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे सलग तिसऱ्या वर्षी म्हसळा शहरात भव्य किल्ले स्पर्धा संपन्न...


म्हसळा : सुशील यादव
लहान मुलांकडे पाहिलं की सर्वप्रथम लक्षात येते की त्यांची अमाप ऊर्जा आणि उत्साह, नवं काहीतरी शिकण्याची धडपड. या सर्व गुणांना उत्तम व्यासपिठ मिळवून देईल अशी एक कला म्हणजे किल्ले स्पर्धा. आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान ने सालाबादप्रमाणे यंदाही केले.  म्हसळा शहरात गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जावल्य इतिहास गड-किल्ले रूपी समजावा हा यामागील उद्देश असतो. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष असून शहरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी म्हणजे २०१५  साली जेव्हा हि किल्ले स्पर्धा प्रतिष्ठान तर्फे भरविण्यात आली त्यावेळी मुलांनी किल्ले छान बनविले होते परंतु त्या किल्याचा इतिहास सांगण्यात हि मुले कुठेतरी कमी पडत होती परंतु या वर्षीचे विशेष म्हणजे जो किल्ला आपण बनविला आहे त्याची इतंभूत माहिती हि मुले सांगत होती. "चंगळवादी, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणा-तरुण पिढीला मागे पाडीत आजची बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वाना आठवण करून दिला आहे. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड, माती, विटा, पाणी, लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हातान्हात फिरत होती. काही बदल हे निश्चितच झाले असून बदलत्या काळाबरोबरच आधुनिकतेची सांगड पहावयास मिळाली. एरवी मोबाईलच्या ऑनलाईन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालताना पाहून बरे वाटले. प्रतिष्ठान तर्फे किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी मुलांनीकिल्ल्यांची छोटी प्रतिकृती तयार केली होती. त्याचप्रमाणे किल्ल्यांची माहिती व्यवस्थित मिळवण्यासाठी किल्ल्यावर प्रत्यक्ष भेट देण्याबरोबरीनेच विविध माध्यमातून मिळणा-या चित्रांच्या साहाय्याने किल्ला अधिक रेखीव व्हावा यासाठी बच्चे कंपनीकडून छान प्रयत्न झाले "असे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विषेशतः या स्पर्धेत मुलींचाही सहभाग होता. या भव्य किल्ले स्पर्धेमध्ये 
प्रथम क्रमांक: कु़. यश म. म्हशिलकर व कु. गणेश सि. धिमर (सिंधुदुर्ग),
द्वितीय क्रमांक (विभागून): कु. अनिरुद्ध सं कुडेकर (किल्ला-प्रतापगड) आणि ओमकार ज. गोविलकर (विजयदुर्ग),
तृतीय क्रमांक (विभागून): कु. जान्हवी सु. आंजर्लेकर (किल्ला-रायगड) आणि कु. साहिल नं. कुडतुडकर व कु. विवेक नं. कुडतुडकर (किल्ला-रायगड),
चतुर्थ क्रमांक (विभागून) : कु. अर्जुन सु. यादव व कु. प्रथम सु. कुडेकर (किल्ला-तोरणा) आणि कु. सौरभ सं. पाटकुले व कु. सागर सि. धिमर (किल्ला-राजगड),
पाचवा क्रमांक (विभागून): कु. अनुज गौ. पोतदार व कु. अवधुत प्र. पोतदार (किल्ला-सिंधुदुर्ग) आणि कु. दत्तात्रेय सु. म्हशिलकर (रायगड),
उत्तेजनार्थ: कु. प्रथम बनारसी धिमर यांनी पटकाविला आहे. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सचिन करडे, संतोष कुडेकर, समेळ सर, सुनिल आंजर्लेकर, कौस्तुभ करडे, विशाल सायकर, राजेश करडे, शुभम करडे यांनी अथक परिश्रम घेतले.

  छाया : सुशील यादव

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा