44 वी कोकण परिक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा -2017 अलिबाग येथे दिनांक 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालय परेड मैदान अलिबाग व जिल्हा क्रीडा संकूल नेहूली येथे या स्पर्धा संपन्न होणार.
या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे वैयक्तिक व सामुहीक स्पर्धा होतील.तसेच या स्पर्धेकरीता ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या पाच जिल्ह्यातील तसेच पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई येथील खेळाडू सहभागी होतील. या स्पर्धेचे यजमानपद रायगड जिल्ह्याकडे देण्यात आले आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग तथा समिती प्रमुख, प्रसिद्धी व्यवस्थापन समिती, डी.बी.निघोट,यांनी कळविले आहे.
Post a Comment