२४ बोटांच्या बाळाला जन्म..

सर्वसाधारण माणसाला हातापायाची मिळून 20 बोटे असतात. परंतु रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नवजात बालिकेच्या हातापायाच्या  प्रत्येक  पंजाला 6 अशी एकूण 24 बोटे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी माणगावच्या वरद हॉस्पिटलमध्ये आदिती भादावकर या महिलेने या बालिकेला जन्म दिला, तेव्हा डॉक्टरांसह सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे या बालिकेची सर्व बोटे वेगवेगळी असून ती सर्व कार्यान्वित आहेत.  
बालिकेची प्रकृती उत्तम असून आपल्या वैद्यक व्यवसायाच्या कारकिर्दीत प्रथमच असे बालक पाहिले असल्याचे वरद हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले. ही बातमी परिसरात पसरल्यानंतर नागरिकांनी या बालिकेला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा