श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण मंदिर दरोडा व दुहेरी हत्याकांड खटल्याचा आज निकाल लागला. रायगडचे विशेष मोका न्यायाधीश किशोर पेटकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. दहा आरोपींपैकी ५ आरोपींना न्यायालयाने मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यापूर्वी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या खटल्याच्या सुनावणीत खटल्यातील १२ पैकी २ जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्यावेळी जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रसाद पाटील यांनी आपली बाजू मांडताना ५ आरोपींच्या फाशीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर ३ महिलांना १० वर्ष कारावास, २ सोनारांना ९ वर्ष कारावास व सर्व आरोपींना ५०० रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

धन्यवाद, महाराष्ट्र पोलीस, सर्व अधिकारी
ReplyDeletePost a Comment