म्हसळा : सुशील यादव
म्हसळा ग्रुप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात आमचे लोकप्रतिनिधी, सभापती, सर्व नगरसेवक आणि प्रशासनाने चांगले काम केलेलं असून म्हसळा नगरपंचायत जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यतत्पर असून केवळ तांत्रिकदृष्ट्या अडीअडचणी आलेल्या कामात दोन दिवस विलंब झाला तर शहरात राहून आपल्याच शहराची जाहीर बदनामी करून विरोधक करीत असलेली टीका बिनबुडाची आहे. म्हसळा शहर पाणी टंचाई मुक्त असून उन्हाळ्यात शेवटचे दोन महिने वगळता शहराला सातत्यपूर्ण पाणी पुरवठा होत असतो. शहराला होत असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हि २० वर्षा पूर्वीच्या जुन्या योजना असून शहराची लोकसंख्या आणि निवासी बांधकाम मात्र झपाट्याने वाढत आहे असे असताना म्हसळा नगरपंचायतीने गेल्या वर्षी चार बोअर वेल खोदून व काही ठिकाणी टँकर ने पाणीपुरवठा करून जनतेस सेवा दिली आहे. चालू वर्षी आमचे नेते सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने म्हसळा शहराला स्वतंत्र २ कोटी रुपये खर्चाची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काही दिवसात हे काम सुरु होणार आहे. शहराची नळ पाणी पुरवठा योजना मोठी व जुनी असल्याने काही ठिकाणी पाईप नादुरुस्त असल्याने कधी कधी पाण्याचा दाब वाढल्याने पाईप लिकेज होण्यची घटना घडते. अशी घटना आमच्या निदर्शनास आणल्यास किंवा आल्यास आम्ही तातडीने उपाययोजना करून दुरुस्ती करीत असतो. ज्यांना शहराशी व विकासाशी काही घेणे देणे नाही असे विरोधक डोळ्यात अंजन घालून अशा घटना घडण्याची वात पाहत असतात. व सदर घटनेची शहानिशा न करता व नगरपंचायती च्या निदर्शनास न आणतां केवळ आमच्यावर टीका व शहराची बदनामी करीत आहेत. म्हसळा कन्याशाळेजवळील पाईप लिकेज झाला होता हे मान्य आहे पण तेव्हा ती बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आली तेव्हा ती आम्ही दुरुस्त केली आहे. सदरील पाईप लाईन गंजली असल्याने ती नव्याने करण्याचे प्रस्तावित आहे. शहरात पाणीपुरवठा चालू असताना अचानकपणे पाईप लाईन फुटून पाणी वाया जाणे अशी घटना लाईन गंजलेली असल्याने होणे साहजिकच आहे परंतु सदर घटनेचा संदर्भ देऊन नागर्पन्चायाटची बदनामी करण्याचे कारण काय ? अशीच टीका शहरातील स्वच्छतेबाबत होत असून दररोज २ – ३ टन कचरा भाडेतत्वावर घेतलेल्या डम्पिंग ग्राउंड वर दूरवर टाकला जात असताना विरोधक या बाबतीत विरोधक जाणूनबुजून नगरपंचायतीला पर्यायाने शहराला बदनाम करीत आहेत. मागील ग्रामपंचायतीचा कारभार पाहता आत्ताची नगरपंचायत कितीतरी पटीने चांगल्या दर्जाची नागरी सेवा-सुविधा पुरवीत आहे असा आमचा दावा आहे. आत्तापर्यंत म्हसला नगरपंचायत च्या विकसासाठी आमदार सुनील तटकरे यांनी ८ कोटी रुपये निधीची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. या निधी मधून शहरात अनेक कामे पूर्ण झाली आहेत तसेच अनेक कामे प्रगतिपथाअवर आहेत. सुनील तटकरेंनी दिलेले ‘म्हसळा शहराचा विकास हाच आमचा ध्यास’ हे वचन पाळण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी चे सर्व नगरसेवक म्हसळा नगरीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. जे म्हसळा नगरपंचायतीच्या दैनंदिन सेवेबाबत प्रसिद्धीसाठी बिनबुडाचे आरोप करतात व ताक्रारविना म्हसळा शहराची कोणी जाहीर बदनामी केल्यास आम्ही कायदेशीर कार्यवाही करणार आहोत.
Post a Comment